पान:गाव झिजत आहे.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

3 संस्कृतीला छेद बसला. एकत्र कुटुंब पद्धती ही भारतीयांची शान आहे असे आजहीमला वाटते. ज्या घरात आजोबा आणि नातवंडे याचे नाते पक्के आहे त्यालाच आपणभारतीय कुटुंब म्हणावे असे मला वाटते. पण या प्रथेला बुद्धिवंतांनी छेद दिला नि त्याचेलोण खेड्यापाड्यात पसरले. त्यामुळे खेड्याचा शेजारधर्म तर सोडाच, पण कुटुंबातमाणुसकीने वागण्याचाही धर्म विधुरला. तरुण शिकले, नोकरीला लागले आणि स्वतंत्रकुटुंबाचं अस्तित्व त्याला प्राप्त झाले. यातूनच आपपर भाव निर्माण ला.नोकरीनिमित्ताने मुले विखुरली तरी नाती एकात्म राहवीत. सण, कुळाचार, वाढदिवसइ. निमित्ताने एकमेकांची नाती जपणे महत्त्वाचे. नव्या अर्थाने एकत्र कुटुंबाची कल्पनाकाळासोबत निर्माण करता येते. ज्यात वयस्कांची, लहानांची सुरक्षितता, भावंडांनाएकमेकांची मदत, आधार मिळतो.  शेजारधर्माचे काही अंश आजही ग्रामीण भागात दिसतात. शेजारधर्म हा सर्वधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. पण शहरामधून कोणी धर्ममार्तंड, कोणी पाद्री, कोणी मुल्ला-मौलवी धर्म प्रचारासाठी खेड्यात शिरले. त्यांनीच जातीमध्ये अहंकार निर्माण केला.त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी जाती आणि धार्मिक विद्वेष पसरविला. यात तेल घातलेराजकीय कार्यकर्त्यांनी आणि पुढाऱ्यांनी. कारण कर्तबगारी नसलेल्यांना जातीचं राजकारण करून लवकर पुढारीपण मिळविता येतं. स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण हयातचळवळीत घालविल्यानंतर, परकीय शासनाचा छळ सहन केल्यानंतर, यातना-वेदनाभोगल्यानंतर नेतृत्व प्राप्त होत होते. ते नेतृत्व जाती-धर्म-पंथ यांच्या पलीकडे जाऊनसमाजाचा आणि देशाचा विचार करणारे होते. सध्या मात्र उलट प्रवाह सुरू झाला आहे.देशाचा विचार सोडाच गावाचाही फारसा कोणी विचार करीत नाही. देवाचं नाव आणिदर्शन स्वहितासाठी अनेकजण घेतात. तसा जातीचा उपयोग नेतागिरी करण्यासाठी होत चालला आहे. याचाच कळत-नकळत परिणाम ग्रामीण भागातील शेजारधर्मावर होतआहे. हा धर्म संपला तर “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ" हे खेड्याचं ब्रीदसंपुष्टात येईल. ग्रामीण आहे याची खंत आपण सर्व बाळगणार ना?गावचा धर्म-शेजारधर्म /७१