पान:गाव झिजत आहे.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

“ईलेक्सनमुळे". स्वतंत्र झाल्या-झाल्या गावात इलेक्शन झाली. तेव्हा आम्ही काँग्रेसला मते दिली. काँग्रेस सर्वांचा पक्ष होता. जात-धर्म अशी काही भानगडचनव्हती. काँग्रेस म्हणजे काँग्रेस. पण अलीकडे जातीचेच पक्ष झाले. धोरणावर कुणीचचालत नाही. त्या वृद्धाचे म्हणणे तेथे जमलेल्या चारचौघांना पटत होते.  काही बुद्धिवादी आणि वरच्या वर्गातल्या मंडळीचे म्हणणे असे की,आरक्षणामुळे सुद्धा गावागावातून तट-गट झालेत. कशामुळे काय झाले हा संशोधनाचाविषय आहे. एवढे मात्र खरे की, शेजारधर्म पाळणारे गाव आता जाती-जाती मध्ये,धर्मा-धर्मामध्ये, पक्षा-पक्षामध्ये विभागले गेले आहे. गावाबाहेरचे आणि गावातलेयातले अंतर कमी होत असतानाच जाती-धर्माचे हे नवे कंगोरे गावाला विकसित करूशकतील काय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गावातील शेजारधर्म हा माणुसकीवर आधारलेला होता. दोऱ्यामुळे जसे माळेचे मणी गुंफलेले असतात. छोटे-छोटे मणी माळेची शोभा वाढवितात तशी शोभा शेजारधर्मामुळे गावाला होती. धर्म,जात भिन्न असली तरी माणुसकी मात्र सर्वांच्या ठायी होती. ही माणुसकी आताअस्तंगत होत चालली आहे.खेडेगावातील शोषणाचे मोठे हत्यार असलेला चातुर्वर्ण्य गेल्या काही दशकांतसंपत आला आहे, ही चांगली गोष्ट आहे. चातुर्वर्ण्यातील शिल्लक असलेले काहीअवयव नामशेष झालेच पाहिजे हे आता सर्वांनाच पटत आहे. पण हे होत असतानामाणुसकीची शिकवण देणारी शेजारधर्माची संस्कृती संपुष्टात आली तर गावाचे'गावपण' संपायला वेळ लागणार नाही. दुर्दैवाने आज ते घडत आहे. पूर्वी गावातवेशीतले आणि वेशीबाहेरचे असे दोन भाग होते. आता त्यात भर पडत आहे.जातिधर्माच्या अनेक वेशी निर्माण होत आहेत. याला राजकारण्यांनी सुरू केलेलाजातीयवाद कारणीभूत आहे. वैयक्तिक आणि पक्षीय स्वार्थी राजकारणी कारण नसताना जातीचा अहंकार फुलविण्याचे नीच कर्म करत आहेत. शेजारधर्माचा संस्कार त्यामुळेचपुसट होऊन गावात सदैव अस्थिरता पसरविण्यास सुरवात झाली आहे.शिक्षणाचा प्रसार खेड्यापर्यंत पोहचला हे चांगलेच झाले. परंतु शिक्षणाचासंस्कार मात्र खेड्यापर्यंत पोचू शकला नाही. शहरात जे असते ते चांगलेच असते, अनुकरणप्रिय असते असा समज खेडेगावातील लोकांमध्ये पसरला. शहरात क्वचितचएकत्र कुटुंब पद्धती दिसते. शिक्षण झाले, लग्न झाले, नोकरी लागली की नवराबायकोआई-वडिलांपासून विभक्त होतात. हा विभक्तपणाचा लाजिरवाणा प्रकार पाश्चात्यसंस्कृतीचाच परिणाम आहे. पण पाश्चात्त्य जगात जे-जे घडते ते-ते अनुकरणीय असतेअसा बुद्धिजीवींनी समज करून घेतला आणि या समजानेच भारतातील माणुसकीच्या ७०/ गाव झिजत आहे