पान:गाव झिजत आहे.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वातंत्र्यानंतर मात्र आधुनिक संस्कृतीचा म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभावग्रामीण भागात वाढत गेला. आज असंख्य खेडी आधुनिकतेच्या प्रभावाखाली आपलेदैनंदिन जीवन जगत आहेत. शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नांवर गावागावातून जाणिवानिर्माण झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावही गावातील तरुण वर्गात नवी जाणीवण करीत आहे. हे जरी खरे असले तरी आजच्या विज्ञानयुगातही खेड्यातील--धर्मासंबंधीची तीव्र जाणीव कमी झालेली दिसत नाही. धर्मांधता आणिजातीयवाद यांनी खेड्यातील माणुसकीच्या संस्कृतीला वेढा घातला आहे.विज्ञानामुळे, शिक्षणाच्या प्रसारामुळे मनाची विशालता वाढण्याऐवजी ग्रामीण भागाचीही मने कोती होताहेत की काय असे वाटण्याइतपत परिस्थिती बदलली आहे.खेड्यातला खरा धर्म काय होता? हिंदू की मुसलमान? ख्रिश्चन की पारसी?या प्रश्नांचे उत्तर भूकंपभागातल्या खेड्यातील एका शेतकऱ्याने फार चांगले दिल्याचेमला आठवते. १९९३ च्या किल्लारी भूकंपात काही परदेशी पाहुण्यांना घेऊन भूकंपाचीअवस्था दाखविण्यासाठी  खेड्या-खेड्यातून आम्ही फिरत होतो. एका खेड्यात त्या परदेशी पाहुण्यांनी गंमत म्हणून त्या गावकऱ्याला प्रश्न विचारला. तुमच्या खेड्याचाधर्म काय! आणि त्या शेतकऱ्यांने पटकन उत्तर दिले, 'आमच्या खेड्याचा धर्म "शेजारधर्म". ग्रामीण संस्कृतीतील खऱ्या धर्माची ओळख त्या शेतकऱ्याच्या तोंडून मलाआणि परदेशी पाहुण्यांनाही त्या दिवशी झाली. परंतु बदलत्या परिस्थितीत ही ओळखपुसट होत चालली आहे की काय अशी शंका माझ्या मनात सतत कावतं आहे. शिक्षणाचा गावागावातून झालेला प्रसार माहिती मिळविण्याची सोय आणिसंपर्काच्या वाढत्या साधनांमुळे जातिधर्माच्या भावना पुसट होण्याऐवजी ग्रामीण भागातत्या अधिक तीव्र होत चालल्या आहेत. शेजारधर्म हाच आमच्या गावाचा धर्म असेमानणारे मन संपुष्टात येऊ लागले आहे. मी अमुक जातीचा, तो तमुक जातीचा असाजातीचा अहंकार फुत्कार टाकीत आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, ओबीसी,एस.टी./एन.टी., दलित, हिंदू, मुसलमान अशा जातिधर्माच्या भावना बळावतआहेत. गटा-तटांना खेड्यातूनही चालना मिळत आहे.एक म्हातारा म्हणाला, आमच्या लहानपणी असे नव्हते. मुसलमानांचे डोले बसले की आम्ही धुल्ला खेळायला जायचो. डोल्यांपुढे नाचायचो. डोल्याला तेलवाहायचो. मुसलमानांचा सण गावाचा सण होता. हिंदूंची दिवाळी गावाची दिवाळीहोती. बैलांचा पोळा सर्वांसाठी होता. पण अलीकडे हे बदलले. मी विचारलं असे काझाले? तेव्हा पटक्याखालचे डोके हलले अन् त्या म्हाताऱ्यानं पटकन उत्तर दिले, गावचा धर्म-शेजारधर्म / ६९