पान:गाव झिजत आहे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय समूह जीवनातील परंपरेने जगण्याची रीत आहे. या ग्रामव्यवस्थेला तडा जाता कामा नये असे ज्यांना वाटते त्यांनी आजच्या ग्रामव्यवस्थेच्या होणाऱ्या झिजेचा अभ्यास केला पाहिजे. झीज टाळली पाहिजे तरच ग्रामव्यवस्था टिकून राहील. भारताच्या आदी-अनादी संस्कृतीची खूण म्हणून ग्रामव्यवस्था स्थिर झाली. परिस्थितीप्रमाणे या व्यवस्थेमध्ये काही बदल करणे गरजेचे असले तरी ती व्यवस्था नष्ट होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायला हवी.

साचा:Paragraphbreakभारतीय खेडी आणि खेड्यातील शेती उद्योग ही भारतीयांना जिवंत ठेवणारा

आर्थिक स्रोत आहे. परंतु गेल्या काही दशकात या कृषी उद्योगाकडे पाठ फिरवून अनेकांनी शहरांची वाट धरली आहे. शहरात छोटी-मोठी कामे मिळतात आणि कसे तरी जगता येते अशी अनेकांची धारणा आहे. शेतीवरील मनुष्यबळाचा बोजा कमी केला पाहिजे, हे खरे असले तरी यासाठी शहराकडे धाव घणे हा यावर उपाय नाही. छोटे कुटीर उद्योग, ग्रामोद्योग खेड्यातही निर्माण करता येतील अशी शासनाची इच्छा पाहिजे आणि उद्योगपतींचा निर्धार पाहिजे. असे झाले तर झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि त्यातील दुर्दैवी बकालपणा थांबेल.

साचा:Paragraphbreakशहरीकरणामुळे माणुसकीचा न्हास होत चालला आहे. भारतीय ग्रामसंस्कृती

माणुसकीची शिकवण देणारी संस्कृती आहे अन् ते भारताचे वैभव आहे. हे वैभव टिकावे असे महात्मा गांधी, विनोबांना वाटत होते. शरीरश्रमाला महत्त्व देणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनाही असेच वाटते. म्हणूनच गावाच्या झिजेसंबंधी आणि ही झीज थांबविण्यासाठी काही उपाययोजना सुचविण्याचा प्रयत्न या छोटेखानी पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे साचा:Rightडॉ. द्वारकादास लोहिया साचा:Right३२, किनारा, {{rightसाचा:Gap विद्याकुंज हाउसिंग सोसायटी्|}} साचा:Rightअंबाजोगाई, जि''''''ठळक मजकूर''''''. बीड दिनांक: ०७ सपटेंबर २००७