पान:गाव झिजत आहे.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६. गावचा धर्म-शेजारधर्म

शेतीचा शोध लागला आणि माणसाचे भटकणे थांबले. अन्नाच्या शोधासाठीतो भटकत होता. कंदमुळे खाऊन तो जगत होता. त्याच्या आयुष्यात स्थिरता नव्हतीच. पण शेतीतून अन्नाची निर्मिती करण्याचे तंत्र त्याला कळले. शेतीतून निर्माण होणाऱ्याअन्नातून जगणे शक्य आहे याचा त्याला विश्वास वाटला. त्याच शेतीतून पुन्हा-पुन्हावेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य तो निर्माण करू लागला. योग्य जागा आणि जमिनीपाहून त्यांच्या टोळ्या स्थिरावल्या आणि त्यातूनच वाड्या-वस्त्या उदयास आल्या.गावाचा जन्म झाला. हळूहळू शेती करण्याची आणि समूहजीवन जगण्याची वेगळी संस्कृती जन्माला आली. शेतीचे तंत्र सुधारत गेले. शेती सुधारण्यासाठी नवनव्याअवजारांचा शोध लागला. त्यातूनच अवजारे तयार करणारे, त्या अवजारांचा वापरकरणारे तसेच समाजजीवन सुसह्य व्हावे म्हणून जीवन उपयोगी वस्तू तयार करणारांचेवेगवेगळे गट किंवा वर्ग निर्माण झाले. कदाचित जातींचा जन्म याच प्रक्रियेतून झालाअसावा किंवा वर्गही जन्माला आले असावेत.जात कशी आणि केव्हा निर्माण झाली? धर्म कसा उदयाला आला याचे अनेकतज्ज्ञांनी आणि संशोधकांनी अनेक अंदाज बांधले आहेत. हजारो वर्षांपूर्वी स्थिरझालेल्या खेड्यांतून मात्र जाती-धर्म-वर्ग-वर्ण यांचा समुदाय आपापल्या पायरीने सर्वव्यवहार सांभाळून एकत्र नांदत होता. खेडं म्हणून ते एक होतं. १७ व्या शतकाच्याअखेरीस पाश्चिमात्य देशात औद्योगिक क्रांती झाली. त्या क्रांतीचा परिणाम भारतातहीसर्वत्र जाणवू लागला. ब्रिटिशांच्या भारतावरील आधिपत्यामुळे देखील औद्योगिकक्रांतीला भारतात वेग आला. याचेही परिणाम खेड्यापाड्यावर जाणवू लागले होतेच. गावचा धर्म-शेजारधर्म / ६७