पान:गाव झिजत आहे.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्पादन वाढले पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत फारशीसुधारणा झाली नाही. उलट शेतकरी परावलंबी बनला. ५० वर्षांपूर्वी हायब्रीड बियाणेआणि रासायनिक खताचा उपयोग उत्पादन वाढीसाठी शेतकरी करीतच नव्हता. शेतातपिकणारे बियाणे निवडून चांगल्या बियाण्यांचे तो जतन करीत होता आणि त्याचीचपेरणी करीत होता. हे सर्व बियाणे सरळ जातीचे (स्ट्रेट व्हरायटी) होते. त्यामुळे बाजारातून किंवा दुकानातून बियाणे खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर येत नव्हती.खताचेही तसेच होते. शेणखत उकिरड्यावर पडायचे. पालापाचोळा त्यावर पडायचा.राख, मल-मूत्र उकिरड्यावर टाकले जायचे. एवढेच नव्हे तर सांडपाणी आणिधुतलेल्या भांड्याकुंड्यांचे पाणीही उकिरड्यातच जमा व्हायचे. घर तेथे उकिरडाअशीच जवळपास परिस्थिती होती. वर्षभर साठलेल्या उकिरड्यातील खत शेतकरी उन्हाळ्यात शेतावर नेऊन पसरीत होता. यालाच अलीकडच्या काळात सेंद्रिय खतम्हणतात. यामुळे खतावर देखील त्याचा फारसा खर्च होत नव्हताच.पण काळ बदलला. निरनिराळ्या कंपन्यांनी हायब्रीड बियाणे तयार केले.रासायनिक खते तयार केली. शहरातून आणि खेड्यातून खत-बियाणे विक्रीची हजारो दुकाने सुरू झाली. शेतकऱ्यांत त्याचे आकर्षण वाढले. त्याचे उत्पादनही वाढले.त्यामुळे उकिरड्यावरील सेंद्रिय खत आणि परंपरागत बियाण्यांचा त्याला विसर पडला.हायब्रीड बियाणे आणि रासायनिक खताकडे त्याचा कल वाढला. या आधुनिक खतबियाण्यांबरोबरच पिकावर नवनवे रोग पडले. त्यापासून पिकांची नासाडी होऊ नयेम्हणून कीटकनाशकांचा प्रसार आणि उपयोग वाढला. या बरोबर शेतकऱ्याचा खर्च

वाढला. आधुनिक बियाणे वापरूनही उत्पादन घटू लागले. शेती परवडेनाशी झाली.पण दुसरा उद्योग करणे त्याला शक्य नव्हते. शेतातील नुकसान भरून काढण्यासाठीसावकार आणि बँकेच्या कर्जाचा त्याने आधार घेतला.

पण त्यातूनही तो वर आलानाही. ऊस, केळी, द्राक्ष, बागायती शेती सोडली तर ९० टक्के शेतकरी कर्जाच्याभोवऱ्यात अडकलेला आहे. तो भरपूर शरीरश्रम करतो. पण त्याचा योग्य मोबदलात्याला मिळत नाही. शासनाच्या शेती विकासाच्या योजनांचा वापर करूनही तो

कर्जबाजारीच राहिला आहे. यामुळेच आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतीसंबंधीचीशासनाची चुकीची धोरणे, बियाणे, खताचे, कीटकनाशकांचे झालेले केंद्रीकरण याचात्याच्या शेतीवर अनिष्ट परिणाम होत आहे. म्हणून आता रासायनिक खतामुळे शेतीतभरपूर उत्पादन वाढेल आणि देश अन्नधान्याच्याबाबतीत स्वावलंबी होईल असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकत नाही. उलट एकविसाव्या शतकाच्या ६४ / गाव झिजत आहे