पान:गाव झिजत आहे.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी

देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक प्रश्नांना देशाला सामोरे जावे लागले. लोकसंख्याआणि अन्नधान्याची टंचाई या समस्यांना तोंड द्यावे लागले. १९५० च्या सुमारालालोकसंख्या सुमारे ३५ कोटी होती आणि अन्नधान्याचे उत्पादन ५० दशलक्ष टन एवढेहोते. पुढे लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. शेती उत्पादनाने मात्र कासवाची चालधरली. १९६५-७० च्या सुमारास अन्नधान्याची तीव्र टंचाई देशात निर्माण झाली.भूकबळी टाळण्यासाठी नाइलाजाने परदेशातून धान्य आणावे लागले. भारताने इच्छाप्रसिद्ध आहे. या कराराप्रमाणे अमेरिकेतून लाखो टन गहू भारतात आयात झाला.डुकरांना चारावयाचा गहू अमेरिकेने भारताला दिला, अशी त्यावेळी टीकाही झाली.पण त्या गव्हाने भारताची भूक भागविली एवढे मात्र खरे. १९७२ च्या दुष्काळातमहाराष्ट्राची अन्नधान्याची परिस्थिती खूपच नाजूक होती. हाताला काम द्या आणिपोटाला अन्न द्या अशी घोषणा देत विरोधी पक्षांनी खेड्यांतील लाखो लोकांना रस्त्यावरआणले. या सर्व परिस्थितीचा शासनाला विचार करणे भागच होते तेव्हापासूनअन्नधान्याच्या वाढीव उत्पादनासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न सुरू झाले.१९६५-६६ च्या सुमारालाच अधिक उत्पादन देणारे हायब्रीड ज्वारीचे बियाणेबाजारात आले. त्या बियाण्यांचा पदर धरून रासायनिक खते आली आणि बघता-बघता देशाचे धान्य उत्पादन वाढले. १९९९-२००० च्या सुमाराला शेती उत्पादनानेउच्चांक गाठला. २०० दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन शेतकऱ्याने केले. देशअन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी/६३