पान:गाव झिजत आहे.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पिण्याच्या पाण्याची टंचाई ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यातसामान्य माणसांना बळी पडावे लागत आहे, गावातील श्रीमंत माणसे पिण्याच्यापाण्याची सोय प्रसंगी स्वखर्चाने करतात त्यांना ते शक्यही आहे. पण सामान्य माणसाचेकाय? पाणी आणण्यासाठी अर्धा दिवस खर्च करणे त्यांना परवडणारे नाही. त्यांचीमजुरी बुडते. मजुरीच मिळाली नाही तर त्यांनी जगायचे कसे. शहरातील माणसे हुशार आहेत. आपल्या हक्कांसाठी ते आवाज उठवितात. एकत्र येऊन शासनावर दबावआणतात. त्यांना पाणी मिळते. खेड्याचे चित्र मात्र वेगळे आहे. खेड्यातील माणसेधर्म, जात, अज्ञान, राजकारण,दारिद्र्य यामुळे असंघटित आहेत. ते एकत्र येऊ शकतनाहीत. म्हणून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईच्या काळात वणवण भटकावेलागते. गतवर्षी तर असंख्य तळी, धरणे कोरडी पडली. त्यात जे काही पाणी शिल्लक होते तेही शहरवासीयांना पुरविण्यात आले. मुंबई-पुण्यासारख्या शहरांना टंचाईच्याकाळातही १५०ते २०० लिटर पाणी दरडोई दररोज पुरविण्यात आले. दुष्काळीखेड्यांना मात्र ही मर्यादा २० लिटरची ठरविण्यात आली. हा अन्यायच आहे. त्यांच्याशिवारावर पडणारे पाणी त्यांना मिळत नाही. शिवारातून धरणात आलेले पाणी मात्रशहरवासीयांना पुरविले जाते. ही विषमता कोण घालवणार?ग्रामीण भागातील पाण्याच्या टंचाईची कारणे शोधली तर असे लक्षात येते की,धरणातील पाणी उसासारख्या पिकाला मोठ्या प्रमाणात दिले जात आहे. एक हेक्टरऊसाला जगविण्यासाठी दोन कोटी पन्नास लाख लिटर पाणी लागते. केळीच्याउत्पादनाला एक कोटी साठ लाख लिटर पाणी हेक्टरी लागते. एक हेक्टर द्राक्षलागवडीसाठी एक कोटी पन्नास लाख लिटर पाणी लागते. तर मोसंबी, संत्री यासारख्याफळझाडांच्या लागवडीसाठी एक कोटी वीस लाख लिटर पाणी लागते असे तज्ज्ञांचेम्हणणे आहे. श्रीमंत बागायतदारांनी धरणातले पाणी याच पिकासाठी वळविले. त्यामुळेग्रामीण भागात इतर पिकांसाठी तर सोडाच पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवू लागलीआहे. बोअर करून भूगर्भातील पाणी वर काढण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणात श्रीमंतशेतकऱ्यांनी अमलात आणला. कायद्याचे बंधन कोणीही पाळले नाही. शासनानेहीत्यांना तशी जाणीव करून दिली नाही फुटांपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी बोअर्स घेतले गेले. पण श्रीमंत शेतकऱ्यांनी याआणि लाखो लिटर पाणी पिकासाठी वापरले. त्यामुळे कमी खोलीचे बोअर कोरडेबोअरचे पाणी पिण्यासाठी-पावसाचे पाणी शेतीसाठी/ ५९