पान:गाव झिजत आहे.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२. ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण

बंधनकारकपहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच ग्रामीण विकासाच्या योजना आखण्यासयोजना सुरू झाली. शेती, रस्ते, शिक्षण, आरोग्य यासंबंधी या योजनेत ग्रामीणविकासाकडे लक्ष पुरविण्यासाठी बऱ्याच बाबींचा विचार केला होता. परंतु म्हणावातेवढा या योजनेचा गावाला हातभार लागला नाही. या योजनेचे मूल्यांकन करणारांचेम्हणणे असे की, ही योजना परिणाकारक ठरली नाही. म्हणून दुसऱ्या पंचवार्षिकयोजनेत जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 'इन्टेसिव्ह अॅग्रीकल्चर डिस्ट्रिक्टप्रोग्राम' तसेच 'इन्टेसिव्ह अॅग्रीकल्चर एरिया प्रोग्राम' अशा योजना दुसऱ्या-तिसऱ्यापंचवार्षिक योजनेत आखण्यात आल्या. त्याचाही म्हणावा तेवढा फायदा खेड्यासाठीझाला नाही. या योजनेपासून लहान शेतकरी आणि मजूर वंचित राहिले. म्हणून पुढच्यायोजनेत म्हणजे १९६९ च्या सुमाराला 'स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सी' आणि'मार्जिनल फार्मर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरल लेबर डेव्हलपमेंट एजन्सी' नावाने योजना सुरूकरण्यात आल्या. याशिवाय १९७२ ते दोन हजार पर्यंत डीपीएपी, कडा,आयआरडीपी, ड्वाक्रा, ट्रायसेम, एनएसएपी, एनएमबीएस, एनओपीएस, आएवायअशाही योजना सुरू करून लाभार्थीना वैयक्तिक लाभ देण्याचा प्रयत्न झाला. अगदीअलीकडच्या काळात सामुदायिक विकासावरही भर देण्यात आला. सीआरएसपी,एसजीआरवाय, एसजीएसवाय सारख्या योजना चालू आहेत. तरी म्हणावा असा बदलग्रामीण अर्थरचनेत झालेला दिसत नाही.ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण बंधनकारक/४७

ठळक मजकूर