पान:गाव झिजत आहे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. यापूर्वी लिहिलेल्या आठ-दहा लेखांमध्ये गाव कसे झिजत आहे यासंबंधीचेविवेचन केले होते. गावचे परपस्परावलंबित्व उखडून काढण्याचे काम गेल्या पन्नासवर्षांत झाले आहे. याला शासनाची धोरणे, आधुनिक सुधारणा, चंगळवादी प्रवृत्ती हीजशी कारणीभूत आहे. तसेच गावचे सामाजिक मानस तयार करण्याचे कामशिक्षणव्यवस्था आणि समाजसेवक करू शकले नाहीत. यामुळे गावच्या सुखासाठी निर्माण झालेली व्यवस्था गावाला सुखी ठेवू शकली नही. आज गावागावामध्ये वरचे १०%लोक श्रीमंत आहेत. पण ९०%चे हालचालूच आहेत. चंगळवादी प्रवृत्ती बोकाळली आहे.आर्थिक कुवत बघून खर्चकरण्याची वृत्ती कोणातही दिसत नाही. कमी वेळात कमी श्रमात अधिक पैसा कसामिळेल याकडेच बहुतेकांचे लक्ष आहे. गावागावात जात-जमातवाद, धर्मवाद यामुळेएकतेत तिढा निर्माण झाला आहे. पक्षीय राजकारणाने त्यात भर घातली आहे. जात,जमात, धर्म, पक्ष या पातळीवर गावागावात गट पडले आहेत. त्यामुळे गाव म्हणूनएकत्र विचार करण्याची प्रवृत्ती संपत आली आहे. परस्परावलंबी गाव होते तोपर्यंतगावात एकी होती. एकीचे बळ मोठे आणि फळही चांगले मिळते.अलीकडच्या काळात अनेक विकास योजना गावासाठी राबविल्या जातअसताना सुद्धा गावाची परिस्थिती खंगत चाललीआहे. सर्व गरजा उपलब्धअसतानाही त्याचे सुख सर्वांना चाखता येत नाही अशी अवस्था होण्याची कारणे शोधणेगरजेचे आहे. असे झाले नाही तर ७३ व्या घटनादुरुस्तीने अधिकार दिले पण गावानेस्वावलंबी मन तयार केले नाही असे होईल. स्थिरचित्त आणि गरजेपुरती आर्थिकव्यवस्था घराघरात निर्माण झाल्याशिवाय 'मेरे गाँव में मेरा राज' चालणार नाही. स्वत:चेराज्य चालविण्यासाठी स्वावलंबन गरजेचे असते. हे स्वावलंबन पुन्हा गावात यावेयासाठी १०० वर्षांपूर्वी गावातील कामगार, मजूर एकमेकांना कौशल्य पुरवीत होते.शेतकरी गावाला अन्नधान्य पुरवीत होता. आधुनिक कौशल्य गावकामगारात निर्माणकेले, प्रक्रिया उद्योग गावातच सुरू झाले, ग्राहक आणि मालक गावातच तयार झालेआणि गरज भागविणाऱ्या वस्तू काही अपवाद वगळता गावातच निर्माण झाल्या तरपुन्हा परस्परावलंबी परंतु स्वावलंबी समाज निर्माण होईल. स्वावलंबन हेग्रामस्वराज्यासाठी महत्त्वाचे आणि बळकट पाऊल असेल. त्या दिशेने गावाचा प्रवाससुरू झाला तरच गावाचे खंगणे थांबेल. ग्रामस्वराज्य अवतरेल. ४६ / गाव झिजत आहे