पान:गाव झिजत आहे.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बनविणारी महाराष्ट्राने सुरू केलेली रोजगार हमी योजना होती. या योजनेने गावातील अनेक कुटुंबांना सावरले. आधार दिला. पण आता हीच योजना गुत्तेदाराच्या कचाट्यातसापडली आहे. यामुळेही गुत्तेदारांचे चीज होणार आणि गावांची झीज चालूच राहणार.गावाची झीज थांबवायची असेल तर केंद्राकडून किंवा प्रांताकडून गावांसाठी राबविल्याजाणाऱ्या योजनांचे पुनरावलोकन झाले पाहिजे. गावागावात सध्या चालू असलेल्याग्रामीण विकासाच्या योजनांबद्दल चर्चा घडवून आणली पाहिजे आणि नंतरच त्यामूल्यावलोकन व्हावे आणि गावकऱ्यांच्या चिंतनातून, गरजेतून आणि सहभागातूननव्या योजना अवतरल्या तरच ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकार होईल. गावाची पदोपदीहोणारी झीज थांबेल आमच्या गावांत आमचे सरकार अशी घोषणा गावकरी स्वाभिमानाने देऊ शकतील. ग्रामराज्य लोकशाहीचा आधार / ४१