पान:गाव झिजत आहे.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वातंत्र्याकडे पाहत होते. गांधींची रामराज्याची कल्पना किंवा विनोबांची अन्त्योदयाची कल्पना ग्रामीण क्षेत्राला पुनर्गठित करण्यासाठीच होती असे मला वाटते. भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांच्या सर्वांगीण विकासातच भारतीयलोकशाहीचा आत्मा स्थिर होऊ शकतो याची जाणीव जेवढी गांधी-विनोबांना होतीत्याच्या काही अंशाने जरी त्यांच्या नावाने टिळा लावून राज्यारोहण करून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना झाली असती तर आजचे गावाचे भयाण स्वरूप केव्हाच संपले असते.गावाच्या विकासापासून शहराकडे विकासाची गंगा गेली असती. आधी पाया बांधलागेला असता आणि मगच विकासाची सुंदर इमारत त्यावर बांधता आली असती. पणगेल्या पन्नास वर्षांत झाले उलटेच! विकासाचा कळस बांधताना पाया मजबूत करण्याचेराजकत्यांना भानच राहिले नाही, आणि आताही लाचारीला जन्म देणाऱ्या थातुरमातुरयोजना विकासाच्या नावाखाली राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना अनुदान,गरिबांना मोफत घरे, गावासाठी चांगल्या सडका, म्हाताऱ्यांना जगण्यासाठी मदत देऊनग्रामीण पुनर्रचना होणार आहे का? ही तर विकास करण्यासाठी केलेली केवळ मलमपट्टीआहे. हे मूळ रोगाचे निदान नव्हे.  ७३व्या घटनादुरुस्तीने ग्रामीण विकासाचे निदान करण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रामीण जनता स्वावलंबी, स्वाभिमानी आणि निर्भय व्हावी यासाठी ७३व्या घटनेत बरेचकाही आहे. परंतु राजकीय बांडगुळांनी त्यालाही गळती लावण्याचा प्रयत्न चालविलाआहे. गावाची झीज थांबविण्यासाठी हा घटनात्मक बदल खूप काही मदत करू शकतो.परंतु त्यासाठी हवे जातीचे!... येरागबाळ्यांनी करण्यासारखे हे काम नाही. सुधारणेसाठीएखादा नियम करणे म्हणजे सुधारणा झाली असे होत नाही. ७३व्या घटना दुरुस्तीतग्रामस्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून अनेक गोष्टींचा समावेश केला परंतु प्रत्यक्षातते घडत नाही, आणि तसे घडवून आणण्याची गावपातळीपासून ते दिल्लीच्या गादीवरबसणाऱ्या राजकर्त्यांची इच्छा नाही. नोकरशाही तर या नियमांना खो देण्यासाठीच सदासिद्ध आहे..  ग्रामराज्य अधिक बळकट करावयाचे असेल तर गावातील लोकांचा सूर बघूनचराजकर्त्यांनी आपला ताल संभाळला पाहिजे. वरून योजना राबविण्याऐवजी गावाकडूनत्या वर पोहचल्या पाहिजेत, पण असे गेल्या पन्नास वर्षांत क्वचितच घडले. डिमांडड्रिव्हन ज्याला म्हणतात अशा योजनेचा शासनाने कधी विचार केला नाही. गेल्यापन्नास वर्षांत ग्रामीण शोषितांना आणि गरजूंना, स्वाभिमानी आणि स्वावलंबी ४०/ गाव झिजत आहे