पान:गाव झिजत आहे.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या अज्ञानाचा फायदा करून घेतला आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात नातशातलाच हा प्रकार आहे. शहराने खेड्यांना आवळा दिला आणि त्याच्या मोबदल्यातभोपळा घेतला. हे थांबले पाहिजे.  खेड्याची सर्वांगानेच धूप होत चालली आहे. ही धूप थांबली नाही तरग्रामस्वराज्याचे स्वप्न साकार तर होणारच नाही; उलट गाव हे गुलामांची वस्ती होईल.कुठल्याही लोकशाहीत गुलामगिरीला थारा नसतो. लोकशाहीवरील तो कलंक आहे.स्वावलंबी, स्वाभिमानी जीवनाच्या आवश्यक गरजा पूर्ण झालेले खेडे हीलोकशाहीची आणि ग्रामराज्याची या देशातील खरी शक्ती आहे. ही शक्तीराज्यकर्त्यांनी, समाजधुरीणांनी, जाणकारांनी ओळखली पाहिजे. यावर वेळीच उपायझाला नाही तर भारतीय लोकशाहीचा वटवृक्ष केव्हाही उन्मळून पडू शकतो.गावकुसातील संसाधनांची चोरी/३७