पान:गाव झिजत आहे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाणीपुरवठा होतो. खेड्यांतील लोकांना मात्र उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीवणवण भटकावे लागते. गावशिवारातले पाणी धरणात आणि धरणातील पाणी शहरात!शहरामध्ये भरमसाठ वेगाने घरे बांधली जात आहेत, हाऊसिंग सोसायट्यानिर्माण होत आहेत. बिल्डर्सचा धंदा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या १५-२०वर्षांत जवळपास सर्वच शहरांचा आकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औरंगाबाद- सारख्या शहराच्या वाढीचा विचार केला तर त्याचा क्रमांक आशिया खंडात पहिलाआहे. महाराष्ट्रात मोठे, मध्यम आणि छोटेअसे जवळपास ४००० उद्योग नोंदणीकृतआहेत. नोंदणी न झालेले हजारो उद्योग आहेत. २६७ औद्योगिक वसाहती आहेत. यासर्व शहरी आणि औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणी एकंदर पाणी वापराच्या आठ टक्के एवढे आहे. हे सर्व उद्योग शहरात असल्यामुळे त्यांना लागणारे पाणी धरणातूनचदिले जाते.मुंबई, पुणे या शहरांना पाणी पुरविण्यासाठी तानसा, भातसा, वैतरणा,खडकवासला अशी धरणे बांधली गेली. या धरणातील पाण्याचा उपयोग ग्रामीणभागात सिंचनासाठी होतच नाही. बांधकामासाठी लागणारे दगड माती, वाळू कोठूनआणली जाते? खेड्यातल्या नद्यांतील वाळू संपत आलेली आहे. हजारो एकरांवरीलमातीचा थर विटा करण्यासाठी संपला आहे. गाव परिसरातील खाणीतून दगड काढलाजात आहे आणि हे सर्व बांधकाम साहित्य शहरात चालले आहे. यामुळे नद्या आटल्याआहेत हजारो एकर जमीन ओसाड पडलेली आहे. याचा अल्पसा मोबदला देऊनशहरांना सुंदर करण्याचे काम बिल्डर्स करीत आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवून हेचालू आहे. शहरात उत्तम फर्निचर बनविले जाते हे खरे. फर्निचरशिवाय श्रीमंतांनाआपले दिवाणखाने सजविताच येत नाहीत पण फर्निचरला लागणारे लाकूड कोणत्या शहरात तयार होते? तेही ही खेड्यांतूनच आणावे लागते. यावरून हे लक्षात येईल कीखेड्यातील जल, जंगल आणि जमिनीचा नाश करून शहरवासी आपले जीवनफुलवीत आहेत. हे थांबले पाहिजे. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, की निसर्ग भरपूरदेऊ शकतो, पण हावऱ्या माणसाची हाव भागवू शकत नाही. शहरात निर्माण झालेल्या भोगवादी संस्कृतीने सभोवतालच्या शेकडो नव्हे हजारो गावांना झिजविण्यास सुरुवातकेली आहे. हे थांबले नाही तर शहरे वाढतील त्यातील बकालपणाही वाढेल, पणग्रामीण भाग नष्ट होईल. शहराने खेड्यांना काहीच दिले नाही असे कोणीही म्हणणारनाही. पण जे दिले त्यापेक्षा कित्येक पटीने परत घेतले, अडवून घेतले, नाडून घेतले. " ३६ / गाव झिजत आहे li