पान:गाव झिजत आहे.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९. गावकुसातील संसाधनांची चोरी

गावाची आर्थिक धूप विविध मार्गाने कशी होते याचा विविध दृष्टिकोनातूनअभ्यास झालेला आहे. आर्थिक शोषणाबरोबरच गावाचे भौतिक शोषणही सुरूचआहे. यातून निसर्गाचे लाभलेले लेणेही सुटले नाही. महाराष्ट्रात जवळपास ३८० नद्याआहेत आणि त्यांची लांबी १९२६९ कि. मी. इतकी आहे. या छोट्यामोठ्या नद्यांच्या खोऱ्यात हजारो गावे वसलेली आहेत. याच नद्यांवर शेकडो तलाव, बंधारे आणि धरणेबांधली गेली. देशातील एकूण धरणांच्या ५०% धरणे महाराष्ट्रात झाली असे सांगण्यातयेते. यातील पाण्याचा उपयोग शहरवासीयांच्या सुखसोयींसाठी वाढत आहे. शहरांनाअशाच धरणातून पाणी पुरविले जाते. धरणात हे पाणी कोठून आले? गाव परिसरावर पडलेले हे पावसाचे पाणी धरणात साठले आणि त्याचा उपयोग शहरांच्या पिण्यासाठीआणि उद्योगासाठी होत आहे. आज महाराष्ट्रात जवळपास एक लाखापेक्षा जास्तलोकसंख्या असलेली ७२ शहरे आहेत. २० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली२४४ शहरे आहेत. या सर्व शहरांना दररोज दरडोई ७० ते १५० लिटर पाणीपुरवठाहोतो. हा सर्व पाणीपुरवठा हा धरणांतूनच होतो. काही शहरांना तर बऱ्याच अंतरावरूनपाणी आणावे लागते. बंगलोर शहराला १०० कि. मी. अंतरावरून कावेरी नदीवर बांधलेल्या धरणातून पाणी आणले जाते. हैद्राबाद शहरासाठी १३० कि. मी. असलेल्यानदीवरील धरणातून पाणी आणावे लागते. चेन्नईचे पाणी तर २३० कि. मी: असलेल्याधरणातून आणावे लागते. धरणातील पाणी पाइपलाइन टाकून शहरांना पुरविले जातआहे. खेड्यांच्या परिसरांतून या पाइपलाइन शहरात येतात. शहरांना भरगच्च गावकुसातील संसाधनांची चोरी/ ३५