पान:गाव झिजत आहे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्व कमी होऊ लागले. ही सर्व परिस्थिती सुद्धा गावाची आर्थिक झीज होण्यासकारणीभूत ठरली आहे. गावाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी करायचे असेल तर गावच्यारजा गावातील लोकांकडूनच भागवल्या पाहिजेत. शहरात मिळणारे चांगले आणिगावात मिळणारे कमी दर्जाचे ही गावकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे.चांभारकीचा परंपरागत धंदा करणाऱ्या मुलांनी तोच धंदा केला पाहिजे यामताचा मी नाही. चांभाराचा मुलगा हुशार असेल तर तो डॉक्टर, इंजीनिअर होईल. पणत्या चांभाराऐवजी गावांत कोणी तरी चामडी कमविणारा वा जोडे करणारा असलापाहिजे. त्यांनी तयार केलेले जोडे गावातील लोकांनी घेतले पाहिजेत. गावातच तेलकाढले पाहिजे. दावे दोरखंडाचा उद्योग गावातच कोणी तरी केला पाहिजे. गावातीलशिंप्याकडून कपडे शिवून घेतलेपाहिजेत. सुतार-लोहाराकडून अवजारे करून घेतलीपाहिजेत अशी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. परंपरागत बारा बलुतेदाराची गरज नाही. हे उद्योग इतर कोणीही केले तरी चालतील. पण वरील वस्तू गावांत तयारकरणाऱ्या कारागिरांची आज गरज आहे.आज लघुयंत्रे मिळतात. त्यांचा वापर बलुतेदार कारागिरांनी केला तर चांगल्या दर्जाच्या, सुबक वस्तू गावात तयार होऊ शकतील.एवढेच नव्हे तर या कारागिरांनी गावांत तयार केलेल्या वस्तू गावांतील लोकांनीखरेदी कराव्यात. गावांतील वस्तू खरेदी केल्या तर गावातील श्रम गावात राहतील.पाच-दहा कुटुंबांना कायमचा रोजगार मिळेल. गावची होणारी झीज थांबवता येईल. गावकुसातच उद्योगांची निर्मिती/३३