पान:गाव झिजत आहे.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेशीबाहेरच्या लोकांनी शेतकऱ्यांच्या मृत जनावरांची विल्हेवाट लावायची.या सर्वांच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनी या गावकामगारांना वर्षभर लागणारे धन-धान्यपुरवायचे. पारंपरिक कारागिराच्या मदतीशिवाय शेतकरी किंवा गावकऱ्यांचा संसारअपूर्ण होता. तकऱ्यांच्या धनधान्याच्या मदतीशिवाय गावकारागीरांना जगणे कठीणहोते म्हणून हे सर्व वर्ग परस्परावलंबी होते. या परस्परावलंबनातूनच शेजारधर्म पाळलाजाऊ लागला. या संबंधामुळेच गावातही एकमेकांचा दर्जा सांभाळला गेला. तंटे बखेडेसामोपचाराने सुटू लागले. गावागावात राहणाऱ्या सर्वच कुटुंबांना एकमेकांच्या मदतीनेजगण्याची सय लागली होती. गाव सुखी-समाधानी होते.पण हळूहळू हे वातावरण बदलले. शिक्षणाचे प्रमाण वाढले. त्यामुळेस्वाभिमान वाढला. आपली पिळवणूक होत आहे याचे भान आले. त्यातूनच बाराबलुतेदारांचा गाडा हळूहळू बिघडत गेला. बारा बलुतेदारी विस्कळीत झाली. एकाअर्थाने हे बरेच झाले. कारण या प्रथेमध्ये अडकलेल्या माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक वरच्या वर्गाने दिली होती. माणसांसारखे त्याने जगावे असा फारसा कोणीप्रयत्न केला नव्हता. कालांतराने फुले, आंबेडकर, शाहू महाराज आदीसमाजसुधारकांच्या विचारांचा प्रभाव वाढत गेला. बारा बलुतेदारांची मुलं शिकली.नोकरीला लागली. चांगलं जीवन जगू लागली. त्यांना सन्मान मिळू लागला.पिळवणूक आणि माणुसकीहीन वागणूक या बारा बलुतेदारांना चिकटलेल्या दोन जळवाहोत्या. यातून हा समाज बाहेर पडत गेला.याचा दुसरा परिणाम मात्र गावाच्या दृष्टीने चांगला झाला नाही. गावालासहाय्यभूत होणाऱ्या वस्तू गावात मिळणे दुर्मिळ झाले. विशेषत: शेती व्यवसायालालागणाऱ्या अवजारांच्या र्मितीचे काम मंदावले. या सर्व गोष्टी शहरात निर्माण होऊलागल्या. अगदी आयत्या कपड्यापासून दावे-दोरखंडापर्यंत सर्वच वस्तू शहरातून गावात येऊ लागल्या. शहरात येणाऱ्या वस्तू अधिक सुबक आणि आकर्षक आहेत.त्यामुळेही गावात तयार होणाऱ्या वस्तूंची मागणी कमी झाली. गावकामगारांच्यासहकार्याशिवाय आम्ही शेती करू शकतो, दावे- दोरखंड, आयते कपडे, तेल इत्यादीघेऊ शकतो असे शेतकऱ्यांना तसेच गावातील इतर लोकांना वाटू लागले. या बदलत्या परिस्थितीमुळे गावातील परस्परावलंबीत्व कमी झाले. जीवनावश्यक सर्वच गरजाशहराकडून भागविण्याची सोय झाल्यामुळे आपले काही अडत नाही अशी भावनागावकऱ्यांत बळावली. यामुळे गावात तयार होणाऱ्या वस्तू, पक्का माल, औजारे, दावे-दोरखंड, चपला-जोडे, तेल इत्यादींच्या मागणीवर परिणाम झाला. गावकारागिरांचे ३२/ गाव झिजत आहे