पान:गाव झिजत आहे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

. गावकुसातच उद्योगांची निर्मिती

.स्वावलंबन केवळ व्यक्तीपुरतेच मर्यादित नसून ते प्रत्येक गावालाही आवश्यकआहे. पूर्वी खेडी पाडी, गावे स्वावलंबी असायची. हे स्वावलंबन परस्पर सहकार्यातूनआकाराला आले होते. ग्रामीण भागाला समृद्ध करण्यात शेतकऱ्यांसमवेत 'बाराबलुतेदारांचा' वाटाही महत्त्वाचा होता. पारंपरिक कारागिराचा वर्ग म्हणून बाराबलुतेदारी असायची. त्यात प्रामुख्याने सुतार, कुंभार, न्हावी, चांभार, साळी, माळी, शिंपी, रंगारी, सोनार, तेली... यांचा समावेश होता. ही कारागिरांची वर्गवारी होती.याशिवाय वेशीच्या बाहेर ठेवलेला आणखी एक वर्ग होता. या वर्गाकडून मृत जनावरांनाओढून नेणे आणि त्यांची कातडी काढणे, शेणामातीची कामे करणे, जनावरांच्यागोठ्याची सफाई करणे अशा कमी दर्जाची कामे त्यांच्याकडून करून घेतली जात होती. हा वर्ग घाण कामे करतो म्हणून त्याला अस्पृश्य समजले जात होते. घरातली धुणी-भांडी ते बाळाची शी-सू काढणारी आपली आईसुद्धा घाणच कामे करीत होती. तिलाआपण कधी अस्पृश्य मानले नाही. अशाच स्वरूपाची इतर कामे करणाऱ्या व्यक्तींनामात्र समाजाने वेशीबाहेर काढले अस्पृश्य मानले व माणुसकीहीन खालच्या दर्जाचीवागणूक दिली.. शरीरश्रम आणि कौशल्य हे बारा बलुतेदारांचे किंवा पारंपरिक कारागिरांचेएकमेव भांडवल होते. एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे बारा बलुतेदार असे दोन वर्गअसले तरीही हे दोन्ही वर्ग परस्परावलंबी होते. सुतार- लोहाराने शेतीची अवजारेकरायची. गावातल्या लोकांच्या घरासाठी दरवाजे, खिडक्या, माळवदाचे साहित्य तयारकरायचे, शिंप्याने कपडे शिवायचे, तेल्याने कडधान्यांचे तेल काढायचे आणि गावकुसातच उद्योगांची निर्मिती/३१