पान:गाव झिजत आहे.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

. गुळाचे गुन्हाळ तसे साखरेचे साखराळ अलीकडच्या काळात 'गुळवे' हा शब्द ऐकायला सुद्धा मिळेनासा झालाय. गूळ तयार करण्याच्या पाककौशल्यात माहिर असणाऱ्या व्यक्तींना पूर्वी 'गुळवे' म्हणूनओळखले जाई. गेली काही शतके ऊसापासून गूळ तयार करण्याची प्रक्रिया ग्रामीणभागातील जनतेला अवगत होती. खेडोपाडी प्रवासात हमखास गु-हाळे गायची.

आजच्या प्रमाणात त्यावेळी ऊसाला लागणारे पाणीही भरपूर प्रमाणात उपलब्ध होते.पाणी उपसण्याची आजच्याएवढी अद्ययावत यंत्रणा जरी नसली तरी पोहऱ्याने किंवामोटेने विहिरीतील पाणी काढून ऊसाला दिले जाई. दिवसाकाठी एका विहिरीतून पाच-दहा भियांपर्यंत जमीन याद्वारे भिजली जायची. पाणी उपसायच्या मर्यादित साधनांमुळे विहिरीला कितीही पाणी असले तरी ऊस लागवडीला आपोआपच मर्यादा येत होती.सगळ्याच गावांत ऊस होता असेही नाही. जे घरचे बरे होते त्याच्याजवळ ऊसअसायचा. स्वाभाविकच त्याच्याजवळ बैल-बारदान भरपूर राहायचा. यामुळे त्यांनामोटेने पाणी उपसणे शक्य व्हायचे. च्याजवळ ऊस तो.शेतकरी गब्बर हे गणितचहोते, नव्हे तो शेतकरी श्रीमंत समजला जायचा. त्याकाळी साखर कारखाने नसल्यानेगुळासाठीच ऊसाची लागवड होत होती. अशा गुन्हाळापासून तयार झालेला गूळ त्या त्या गावपरिसरातच विकला जायचा हे विशेष .अत्याधुनिकतेच्या धबडग्यात खेडी कधी बदलली ते आपल्या लक्षातही आलेनाही. विहिरींची जागा बोरने घेतली. मोटेच्या जागेवर इंजीन, इलेक्ट्रिक पंपाने कब्जाकेला. मोटेसमवेत मोटेवरची गाणीही विरली. गुळाबद्दलही असेच झाले. गूळ, काकवीयाची जागा साखरेने घेतली, क्युब्सने घेतली. साखरेच्या उपलब्धतेमुळे लोकांचा . गुळाचे गुन्हाळ तसे साखरेचे साखराळ / २७