पान:गाव झिजत आहे.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राहणारेही तेवढेच निघतील. याचा अर्थ असा निघतो की, महिन्याकाठी याविद्यार्थ्यांकडून त्यांच्या सुखसोयीसाठी या शहरात दहा लाख रूपये येतात. याविद्यार्थ्यांना प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्धझाल्या तर अंबाजोगाई सारख्या गावात येणारा पैसा त्या खेड्यातच राहील. दरडोईदरमहा शहरात येणारा पैसा शहरात येणार नाही. यात ग्रामीण भागातील पालकांचाफायदा तर आहेच आहे, शिवाय शहराच्या वाढीवर ही मर्यादा येईल. गावातच उच्चशिक्षणाची सोय करणाऱ्या गावांची संख्या वाढेल. अर्थात या वाढीला निश्चित मर्यादाअसेल. याचा फायदा मतदारसंघातील लोकांना अप्रत्यक्षरीत्या होईलच. यामुळेविद्यार्थ्यांच्या पालकांचे सरासरी अडीचशे ते पाचशे रुपये दर महिन्याला वाचतील.त्याबरोबरच ज्या गावात पदवी आणि पदव्युत्तर, तांत्रिक आणि इतर शिक्षणाची सोयआहे त्या गावांचाही चांगला विकास होईल. त्या गावांचे उत्पन्न वाढेल. गावातच सर्वशिक्षक, प्राध्यापकांना राहण्याचे बंधन केल्यामुळे शिक्षक-प्राध्यापकांचे पगार गावातचखर्च होतील. शालेय साहित्य विक्रीचीही काही दुकाने चालतील. छोट्या-मोठ्याखानावळी आणि हॉटेल्स चालतील. न्हाव्याच्या दुकानापासून धोब्याच्या दुकानापर्यंतछोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहक मिळतील. दुकानदारांचे उत्पन्न वाढेल. असेशिक्षणकेंद्र असलेल्या गावातील बेकारी यामुळे कमी होईल. रोजगाराची शाश्वतीवाढेल.प्रत्येक पंचायत समितीच्या मतदारसंघात असे शिक्षणकेंद्र उभे केले पाहिजे.शहरात फक्त उच्च तांत्रिक, अतिउच्च शिक्षणाचीच सोय करण्यात आली पाहिजे. यामुळेशहरात वाढणारी तरुणांची प्रचंड गर्दी कमी होईल. गल्लोगल्लीत, खुराड्यात प्राणीठेवावेत अशा पद्धतीने किरायाच्या घरात राहणारांची गर्दी कमी होईल. वाहतुकीवर पडणारा ताण कमी होईल. गुंडागर्दीही कमी होईल. शहराचे पर्यावरण सुधारेल आणिग्रामीण भागाची अर्थव्यवस्थाही सुधारेल. गावांची झीज करणारा एक मार्ग बंद होईल. .] पंचक्रोशीतच शिक्षणाच्या सोयींची उपलब्धता /२५