पान:गाव झिजत आहे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाविद्यालये ही सुरू झाली आहेत. या तुलनेत तांत्रिक आणि कौशल्यावर आधारिततंत्रनिकेतन महाविद्यालये मात्र आजही शहराची सीमा ओलांडून खेड्यांपर्यंत पोचलीनाहीत. अशी महाविद्यालये शहरातच असल्याने केवळ घरची आर्थिक परिस्थिती बरीअसणाऱ्या पालकांचीच मुले अशा शिक्षणासाठी शहरात जाऊ लागली. शिवाय मुलामुलींना शिक्षणासाठी शहरात ठेवणे ही एक प्रतिष्ठेची, श्रीमंतीची बाब समजलीजाऊ लागली. आर्थिक निकषावर शिक्षणात भेद निर्माण झाला. या शिक्षणसंस्थांनीआपल्या शहरातील सीमा न ओलांडल्यामुळे खेड्यांतील गोरगरिबांची मुले अशाशिक्षणापासून आजही वंचितच आहेत. म्हणूनच की काय स्वयंपूर्ण खेड्याच्याचळवळीतील खेड्यांच्या वाट्याला हे अपंगत्व आल्यासारखे वाटते. ग्रामराज्याला मूळआकार देण्याकरिता हे अपंगत्व दूर करावे लागेल.प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघ एक एकक म्हणून गणला पाहिजे. अशामतदार संघातील एखाद्या गावी सर्व शिक्षणाच्या सुविधांचे संकुल उभारावयास पाहि. अशा संकुलात कला शाखेपासून विज्ञान, तंत्रज्ञान, गणक, त्रनिकेतन, पदव्युत्तरशिक्षण आदि ज्ञानशाखेतील शिक्षणाची सोय व्हावयास हवी. यामुळे त्या त्यापंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेता येईल. दूर शहरालाजाऊन शिक्षण घेण्यासाठी जो खर्च त्याला लागणार होता तो लागणार नाही. शिवायत्या त्या पंचक्रोशीतील अशा संकुलातच अथवा उपलब्ध असलेल्या शिक्षण संस्थांतचप्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे हे बंधनकारक केल्यास अशी संकुलेही विद्यार्थ्यांनी भरून जातील. महाविद्यालयेही चांगली चालतील. उपलब्ध नसलेल्या ज्ञानशाखांसाठीच विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिल्यास गावातही केवळशैक्षणिकच नव्हे तर आर्थिक उलाढालही वाढेल. जवळच शिक्षणाची सोय उपलब्धझाल्याने आपल्या शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या शिक्षणखर्चातही कपात होईल.एवढेच नव्हे तर सुट्टीच्या दिवसांत हे विद्यार्थी आपआपल्या घरच्या कामाला, श्रमाला उपयोगी पडतील.आज कुठल्याही खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यास येणाराविद्यार्थी दरमहा सरासरी ५०० ते १००० रुपये खर्च करतो. या खर्चात प्रवास,खोलीभाडे, भोजन, कपडे, क्षणसाहित्य यावर होणारा खर्च समाविष्ट आहे. त्याचाफायदा तो शिक्षण घेत असलेल्या शहराला होतो. दररोज बसने जा-ये करणारा विद्यार्थीसुध्दा महिन्याकाठी अडीचशे ते तीनशे रुपयांचा खर्च करतो. अंबाजोगाई-ठिकाणी दररोज जा-ये करणारे किमान हजार विद्यार्थी आहेत. किरायाने खोल्या करून -सारख्या २४ / गाव झिजत आहे