पान:गाव झिजत आहे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

. पंचक्रोशीतच शिक्षणाच्या सोयींचीउपलब्धता

स्वयंपूर्ण खेडे हा महात्मा गांधी यांच्या ग्रामराज्य चळवळीचा मुख्य आधारहोता. पंचक्रोशीतील उत्पादनावर पंचक्रोशीतच प्रक्रिया व्हावी असे यात अपेक्षित होते.महात्मा गांधीची दूरदृष्टी शिक्षणविषयक उपक्रमांना लागू करायला हवी. असे झाल्यासशैक्षणिक दृष्टिकोनातून खेडे स्वयंपूर्ण व्हावयास विलंब लागणार नाही.  पूर्वी म्हणजे निजाम राजवटीत ठराविक गावातच शाळा होत्या. छोट्यागावातील विद्यार्थी शाळा असलेल्या गावात येऊन शिक्षण घ्यायचे. गावातील सर्वचविद्यार्थी शाळेत गेले पाहिजेत असे बंधन त्या काळी नव्हते. दलित, मातंगांची मुलेक्वचितच शाळेत जायची. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासमवेतच चातुर्वर्ण्य भोगावे लागे.सवर्ण विद्यार्थ्यांपासून या विद्यार्थ्यांना वेगळे बसवले जाई.सर्वांसाठी शिक्षण अशी घोषणा स्वातंत्र्यानंतर जनमानसावर बिंबवण्यात आली.शिवाय शिक्षणक्षेत्रातली चातुर्वर्ण्य व्यवस्था संपविण्यासाठी खेड्यापाड्यांतूनही प्रयत्नझाल्याने वाढत्या लोकसंख्येप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीचवाढली. हजार लोकवस्तीच्या गावातही साधारणपणे २० ते २५ मुले शिक्षणासाठी शाळेत येऊ लागली. साधारणतः: तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातसातवीपर्यंत शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली. निजाम राजवटीत दहावीच्याशिक्षणासाठी हैद्राबादला जावे लागे. ती परिस्थिती आता राहिली नाही. मोठ्या गावातआता दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. एवढेच नाहीतर काही गावात कनिष्ठपंचक्रोशीतच शिक्षणाच्या सोयींची उपलब्धता / २३