पान:गाव झिजत आहे.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काढतात. 'तुझ्या मालाचा भाव तू ठरवायचा नसतो. आडते ठरवितात.' असे त्यालाकोणी सांगितले तर ते बरोबरच आहे असेही सांगणारे बाजारात अनेकजण भेटतात.  मला असे वाटते की, शेतीतील उत्पादन वाढवूनही आजचा शेतकरी हलाखीचेजीवन जगत आहे. याची कारणे अनेक असतील, पण सर्वांत महत्त्वाचे कारण त्यालास्वतःच्या उत्पादित मालाची किंमत किंवा भाव ठरविता येत नाही हे आहे.लोकशाहीमुळे शेती, उद्योग, व्यापारात अनेक व्यवस्था शासनाने निर्माण केल्या.कोणीही कोणाची पिळवणूक करता कामा नये हा त्यामागचा उद्देश असला तरीशेतकऱ्याने स्वतः उत्पादित केलेल्या शेतमालाची किंमत ठरविण्याचे स्वातंत्र्यभारतातही त्याला उपभोगता आले नाही. हे स्वातंत्र्य कसे द्यायचे हा अडचणीचा मुद्दाहोणार असला तरी ते दिल्याशिवाय शेतकऱ्यांचा उत्क होणे शक्य नाही. शेती-व्यवसाय उत्तम होता कारण त्या काळात आपल्या उत्पादित मालाचा भाव वा किंमतमाल विकत घेणारा व्यापारी किंवा ग्राहक ठरवीत नव्हता तर तो शेतकरी ठरवीत होता.कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा आडत दुकानदार हे स्वातंत्र्य शेतकऱ्याला देऊशकतील असा बदल या व्यवस्थेत झाल्याशिवाय ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या हिताचीठरणार नाही.

उत्पादनाचे मूल्य ठरविण्याचा अधिकार / २१