पान:गाव झिजत आहे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

. उत्पादनाचे मूल्य ठरविण्याचा अधिकार

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भोवती लोकशाहीची संकल्पना गुंफलेलीआहे. भारताने लोकशाही स्वीकारताना या त्रिसूत्रीचा अंगिकार केलेला आहे, पणलोकशाहीची ही मार्गदर्शक सूत्रे भारतात तरी घटनेच्या बाहेर पडली नाहीत. आम्हीसमतेचा स्वीकार केला, परंतु मतदान सोडले तर इतर क्षेत्रांत समता अद्यापही प्रस्थापित झाली नाही. बंधुतेबद्दल न बोललेलेच बरे. स्वातंत्र्याचीही अशीच बोळवण करण्यातआली आहे. मताचे स्वातंत्र्य, उद्योग करण्याचे स्वातंत्र्य. उद्योगातून निर्माण होणाऱ्यावस्तूंच्या किमती ठरविण्याचे स्वातंत्र्य. विचारस्वातंत्र्य असे स्वातंत्र्याचे अनेक रंगआहेत. मात्र या रंगांचे सौंदर्य फार कमी भारतीयांना डोळे भरून पाहता आले. ज्यांची संख्या अल्प प्रमाणात आहे अशांना या स्वातंत्र्याने दिलासा दिला आहे, पण ज्यांचीसंख्या मोठी आहे अशा भारतीयांपासून हे स्वातंत्र्य आणखी दूर आहे.  ब्रिटिशांनी भारतावर राज्य केल्याचे दु:ख आहेच, पण त्यांनी आमचा गावगाडाविस्कळीत केला याचे दु:ख अधिक आहे. ब्रिटिशपूर्व काळातील गावगाडा हापरस्परावलंबी होता. त्यामुळे त्या वातावरणात एकमेकांच्या मताची, मदतीची कदरहोती. गावातील परंपरागत कारागिरांची गरज लक्षात आली होती. शेजारधर्म पाळलात होता. मोठ्या प्रमाणात निर्माण केलेल्या वस्तूंचा क्रयविक्रय शेतकरी स्वत: करीत होता. एवढेच नव्हे तर त्याने निर्माण केलेल्या वस्तूंची किंमतही तो ठरवीत होता.गावातील भुसार मालाचे उद्योग करणाऱ्याला वस्तू विकायची की नाही हे तो ठरवीत होता. नव्हे याचे स्वातंत्र्य त्याला होते; आणि म्हणूनच शेतीचा उद्योग सर्वोत्तम उद्योग १८/ गाव झिजत आहे