पान:गाव झिजत आहे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या सर्व चक्राचा विचार केला तर शेतकऱ्याने अधिक उत्पादन करणे म्हणजे अधिक शोषित होणे असे वाटते. पूर्वीच्या काळी गावागावात अशा जीवनावश्यकवस्तूंवर प्रक्रिया करण्याची पद्धत रूढ होती. गावातील तेली शेतकऱ्याला -प्रमाणे तेलबियांतून तेल काढून देत होता. त्यात त्याला नफा मिळत नव्हता. त्याला त्याच्या श्रमाची किंमत मिळत होती. आजचा प्रक्रिया उद्योग श्रममूल्य मिळविण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही; तर तो व्यापार झाला आहे. नफा मिळविणे हा कुठल्याही व्यापाऱ्याचा उद्देश असतोच. या सबंध प्रक्रियेमध्ये अधिक मेहनतकरणारा शेतकरी कमी उत्पन्न मिळवतो आणि कमी मेहनत करणारा प्रक्रिया कारखानदारकमी वेळात जास्त उत्पन्न मिळवितो. मला वाटते ही कळत नकळत शेतकऱ्यांच्याश्रमाची चोरी आहे. या नकळत होणाऱ्या चोरीमुळेच शेतकरी देशोधडीस लागत आहे.ही चोरीच आहे. ही चोरी थांबवायची असेल तर शेतीमध्ये उत्पादन होणाऱ्या वस्तूंवरशक्य तेवढे प्रक्रिया उद्योग, अन्नधान्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग त्याच गावात सुरू केलेपाहिजेत. गावाची गरज ओळखून प्रक्रिया उद्योगाद्वारे गरजेपुरता पक्का माल तयारझाला तर शेतकरी कच्च्या आणि पक्क्या अशा दोन्ही मालाचा उत्पादक होईल. त्याच्या श्रमाची होणारी चोरी थांबेल. त्याचे उत्पन्न वाढेल.  शेतीउत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग पूर्वीच्या काळी गावागावात सुरू होते. गावात तेली होता. दावे-दोरखंड तयार करणारे होते. गावातला धनगरच घोंगड्या तयार करीत होता. सर्वच गावांतून कापड तयार करणारे नसले तरी जवळ-पासच्या खेड्यांतून विणकर लोक होते. गावातच गुन्हाळ चालायचे. पाक, गूळ आणि काही वेळा खडीसाखरही गावात तयार होत असे. पण औद्योगिकरणाच्या व आधुनिकीकरणाच्या नावाखाली हे सारे बदलले आणि शहरात याचे केंद्रीकरण झाले. घराघरात चालणारे जाते' थांबले. शेतकरी मात्र भरडून निघाला. म्हणून शेतीत कच्चा माल तयार करणाराकडेच पक्का माल तयार करण्याची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. गावच्या स्वावलंबनाला यामुळेच हातभार लागणार आहे. . . कचा माल आणि प्रक्रिया/१७