पान:गाव झिजत आहे.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सूर्यफूल, भुईमूग इत्यादी आणि पक्का माल म्हणजे भाकरी, पोळी, पाव, ब्रेड, कापड, साखर, गूळ, तेल, डाळ इत्यादी. ग्रामीण भागात कच्चा माल पक्का करण्याच्या सोयी उपलब्ध नाहीत. पक्का माल तयार करण्यासाठी कौशल्य, भांडवल, तंत्रज्ञान लागते. ते बहुतेक शेतकऱ्यांकडे नाही. परिणामी 'आहे'वाल्यांनी या सर्व क्षेत्रात प्रगती केली आणि कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग शहरात गेले.  कच्चा माल तयार करणारा एक आणि पक्का माल तयार करणारा दुसरा असे त्याला स्वरूप आले. त्यामुळे कच्चा माल तयार करणारा आर्थिकदृष्ट्या नागावला गेला आणि पक्का माल तयार करणारांची आर्थिक प्रगती होत गेली. पक्या मालाचे वैशिष्ट्य असे की ते नेहमी अधिक फायदेशीरअसते. कारण त्याचे मूल्य वर्धित होत असते.कच्च्या मालाचे आणि पक्ष्या मालाचे काळ, काम, वेगाप्रमाणे गणित मांडलेतर असे लक्षात येते की, कच्च्या मालाच्या उत्पादनाला मेहनत अधिक लागते. पीकहाती येण्याचा काळही मोठा असतो. शिवाय सर्व काही वेळेवर करूनही नेमके पीक किती येईल याची खात्री नसते. शेतीउत्पादनाचा भरवसाच नसतो. यामध्ये निसर्गही आपली खेळी खेळत असतो. त्यामुळे शेतीतील उत्पादन हा खेळ आहे. पक्या मालाचा म्हणजेच प्रक्रिया उद्योगाचा विचार केला तर शेती उत्पादनाच्या आड येणारे बहुतेक अडथळे यात नसतात. तुलनेने प्रक्रिया उद्योगातून तयार होणाऱ्या पक्कया मालाला कमी काळ लागतो. त्यावर नफा किंवा फायदा जास्त मिळतो. मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी सूर्यफुलाचे उदाहरण घेऊया. सूर्यफूल हे तेलबिया या वर्गात मोडणारे पीक आहे. शेतीतील मशागत, बी-बियाणे, खते, कीटकनाशके या सर्वांचा प्रमाणात वापर झाला. पाऊस वेळेवर पडला तर १०० ते ११० दिवसांत सूर्यफुलाचे चांगले पीक हाती पडेल. हे पीक हेक्टरी सात ते आठ क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन देते. शेतकऱ्याने ते बाजारात विकले तर त्याला किलोमागे ७५ पैसे ते एक रुपया इतका नफा होतो. उत्पादन आणि उत्पन्न वाढते हे खरे. पण खर्च आणि वेळ याचा विचार केला तर हा फायदा तुटपुंजाच आहे. कारण शेतकरी सूर्यफूल शहरात नेऊन बाजारामध्ये विकतो. आडतदुकानदार, व्यापारी, ऑईलमिलवाले हे विकत घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून ते पेंड आणि तेल याचे उत्पादन करतात. तेलबियांच्या उत्पादनकाळापेक्षा कितीतरी कमी काळ या तेल काढण्याच्या प्रक्रियेस लागतो. त्यामुळे किलोमागे २५ पैसे नफा जरी त्या व्यापाऱ्याला मिळाला तरी तो फायद्यातच राहतो. शेतकरी पुन्हा आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हेच तेलआणि पेंड चढत्या भावात विकत घतो. १६ / गाव झिजत आहे