पान:गाव झिजत आहे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४. कच्चा माल आणि प्रक्रिया

आपला देश सात लाख खेड्यांतून वसला आहे. स्वातंत्र्यानंतर वाढत्या लोकसंख्येमुळे वाड्यांची संख्या वाढत चालली आहे. खेड्यांमध्ये कासवाच्या गतीने सुधारणांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे माजजीवनात फरक झाल्यासारखा जाणवतो.परंतु ग्रामीण भागाच्या उत्पादनस्त्रोतात अंगभूत असा बदल झालेला दिसत नाही.ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेती हाच आहे. आजही गावातील ७०%कुटुंबांचे जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक नाड्या शेतकऱ्यांच्या हातात आहेत असे म्हटले तर कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.गेल्या पाच दशकांत शेतीक्षेत्राने उत्पादनाच्या दृष्टिकोनातून भरघोस प्रगती केली आहे.असे असतानाही शेतकरी कर्जबाजारी आहे  ग्रामीण भागात शेतीमध्ये होणारे उत्पादन हे कच्च्या स्वरूपाचे आहे.उत्पादनाचे हे कच्चे स्वरूप शेतकऱ्यांची आर्थिक पीछेहाट करीत आहे, असे दिसते.शेतकऱ्याने नवीन बियाणे वापरले, खते वापरली, कीटकनाशके वापरली आणिउत्पादन वाढविले. परंतु उत्पादनाचे कच्चे स्वरूप त्याने बदलावे यासाठी फारसे काहीकेले असे मला तरी वाटत नाही. म्हणूनच शेतीतील उत्पादन वाढूनदेखील त्याचेउत्पादन वाढले नाही. आजही त्याला दरिद्री अवस्थेतच जगावे लागत आहे..शेतकरी कच्चा माल तयार करतो आणि दुसरा कोणीतरी त्या मालावर प्रक्रिया करून पुक्का माल तयार करतो, कच्चा माल म्हणजे ज्वारी, गहू, कापूस, तूर, हरभरा, कच्चा माल आणि प्रक्रिया / १५