पान:गाव झिजत आहे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ  शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण तेलंगण, आंध्रप्रदेशमध्ये वाढत आहे. यात महाराष्ट्र मागे आहे अशातली परिस्थिती नाही. महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात गेल्या दोन वर्षांत अनेक शेतकरी कुटुंबांतील कर्त्या माणसांनी आत्महत्या केल्याचे आपल्या वाचनात आले आहे. या आत्महत्यांबद्दल स्वाभाविकच वर्तमान पत्रे, विरोधी पक्ष, सामाजिक

कार्यकर्ते, समाज धुरंधर आदी सहानुभूती दाखवीत आहेत. शासन स्तरावरूनही लगोलग धावपळ होताना दिसते. मदतीचे चेकही त्वरित मृतांच्या कुटुंबियांना दिले जात असल्याचे लक्षात येते. मात्र अशा आत्महत्यांमागच्या कारणांची मीमांसा कोणी करताना दिसत नाही. शासनाने यावर काही ठोस उपाय-योजना केल्याचे कुठे वाचनात आले नाही. या आत्महत्ये मागचा नीट अभ्यास केला असता, शेतकऱ्याने घेतलेले कर्ज हे कारण ठळकपणे समोर येते. सावकाराकडून घेतलेले कर्ज परत करता येत नाही म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.  काही ठिकाणी एखादा अल्पभूधारक बटाईने शेती करतो. कर्ज काढून बियाणे, खते घेतो. निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याला मूळ मालकाला परत देण्याएवढे उत्पन्न शेतात न झाल्याने काहींनी आत्महत्या केल्या आहेत. कारणे काहीही असोत मात्र अशा आत्महत्यांवर ठोस उपाय शोधण्याची नितांत गरज आहे. राजकीय लोकांकडून असेउपाय शोधण्याची न दिसणारी इच्छा हे आणखी दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढले की शेतकरी सुखी होईल असे उच्चरवाने सांगितले जात होते. उत्पादन वाढले की शेतकऱ्याच्या घरात आर्थिक सुबत्ता नांदेल.अनेक सुख सोयी तो घरात खेचून आणील. शेतकऱ्यांचे भले होईल असे प्रतिपादनअनेक राजकीय आणि शेतीक्षेत्रातील तज्ज्ञांनी केले होते. पण हा उपाय खरा नाही. हे महागाई निर्देशांक आणि उत्पन्न वाढ / ११