पान:गाव झिजत आहे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहिजे. ग्रामपंचायतीमधले आर्थिक - भौतिक व्यवहारही बचत गटामध्ये चर्चिले गेले पाहिजेत. दबाव गटाचे स्वरूप या गटांना आले पाहिजे. मात्र आज तरी या पातळीपर्यंत कुठलाही बचत गट गेल्याचे दिसत नाही.  बचत गटाचा जसा गावाच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो तसा गावच्या समाजकारणावरही परिणाम झाला पाहिजे. (त्यासाठी बचत गटाच्या उद्देशात भर घालण्याची गरज आहे.) मात्र यासाठी बचत गटाचे मर्यादित उद्देश विस्तारण्याची गरज आहे. गावात तयार झालेल्या सर्वच बचत गटांना एकत्र करून त्याला गावपतपेढीचे स्वरूप देणे फायद्याचे ठरेल. बचत गटांची पतपेढी करताना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावचे राजकारण, जातकरण, छोट्या बचतीचा गट, मोठ्या बचतीचा गट या सर्वांना एका उपक्रमाखाली आणणे कठीण आहे असे प्रथमदर्शनी कोणासही वाटेल. पण प्रत्येक घरातून किमान एक ते दोन व्यक्ती बचत गटाच्या सभासद झाल्या, तर सर्व गावच अप्रत्यक्षपणे पतपेढीच्या उपक्रमात सहभागी होऊ शकेल. काही दिवस बचत गटांमार्फत बचत करावी. वर्ष सहा महिने बचत करीत रहावे. त्यांना परतफेडीची सवय लावावी. पतपेढीसंबंधी पूर्वतयारी म्हणून सर्व बचत गटांच्या चार- पाच बैठका घेऊन वातावरणनिर्मिती केली आणि मग पतपेढी नोंदणी केली तर असा उपक्रम यशस्वी ठरतो.  अशा प्रकारच्या कुठल्याही आर्थिक उपक्रमांत पारदर्शकता असावी लागते. पारदर्शी व्यवहारासंबंधी सर्वांना कल्पना दिली, पतपेढीतून मिळणाऱ्या नफ्यातोट्याची आणि गावाच्या र्थिकबलीकरणाची स्पष्ट जाणीव गावकऱ्यांत निर्माण केली तर अशा उपक्रमांस गावकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल. दुर्दैवाने अनेक बचत गटांत पारदर्शकता नसल्यामुळे हे गटही बंद पडले आहेत. हा धोका लक्षात घेऊन पतपेढीची पूर्वतयारी करावी लागेल. असे केले तर त्या पतपेढीमध्ये पहिल्या एक-दोन वर्षांतच लाखो रुपयांची उलाढाल सुरू होईल. छोट्या-मोठ्या कारणासाठी शासकीय, सहकारी बँकेत कर्ज मागण्यासाठी ग्रामस्थांना धावपळ करण्याची गरज लागणार नाही.  जेव्हा गावातला एखादा माणूस बँकेतून कर्ज घेतो तेव्हा त्या गावाची एकाअर्थाने धूपच होत असते. गावातील मंडळींनी बँकेत पैसा ठेवला तर पैशावर फार कमी व्याज मिळते. मात्र त्यांच्याच पैशावर बँकर्स दुसऱ्याला कर्ज देऊन भरपूर व्याज मिळवितात. ठेवीदारांच्या पैशावरच बैंका मोठ्या झाल्या आहेत. प्रत्येक गावातून काही ना काही श्रीमंत लोकांनी बँकेत पैसे ठेवले आहेत. गावाचीच पतपेढी असेल आणि कर्ज घेणाराच पतपेढीचा सभासद असेल तर त्यालाही पतपेढीच्या नफ्यात फायदा मिळतो. ८/ गाव झिजत आहे