पान:गाव झिजत आहे.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळणारे कर्ज हा बचत गटात सामील होणाऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय झाला आहे.पण बचत गटाची खरी वाढ होण्यामागे मुख्य कारण बचत गटाला मिळणारी सब्सिडी,बँकेच्या सवलती मिळत असल्यामुळे बचत गट स्थापन करण्यास वेळ लागणार नाही.काही दिवसांच्या यामुळेच आतच बचत गट तयार होतो. आणि त्याला सब्सिडीचा ध्यास लागतो. बचत गटाचे जंगल फोफावण्यासाठी हे सर्वांत मोठे कारण हे. महाराष्ट्रात तरी बचत गटांची संख्या लाखाच्या वर गेली हे.वेगाने होणारी बचत गटांची वाढ हीच बचत गटांच्या भविष्याबद्दल शंका निर्माण करणारी आहे.  बचत गटाचा मूळ उद्देश दरिद्रीनारायणांचा एकत्र करून 'दस की लकडी, एक का बोझ' हलका करण्याचा आहे. शिवाय सावकारमुक्ती हाही त्याचा मुख्य उद्देश आहेच. परंतु सब्सिडीच्या आकर्षणापुढे भान हरवून गेल्याचे जाणवते. दर महिन्याच्या बैठका, कर्जाची रक्कम गोळा करणे, ती बँकेत भरणे, गटातील सभासदांना कमीत कमी व्याजाने कर्ज देणे इत्यादी गोष्टींवर अधिक भर दिला जातो. महिला बचत गट, संमिश्र बचत गट, दारिद्र्य रेषेखालील बचत गट अशा अनेक प्रकारचे बचत गट आहेत. मात्र हे बचत गट करताना आणि त्यांचा दैनंदिन आर्थिक व्यवहार केवळ गटातल्या सभासदांना सब्सिडी किंवा आर्थिक कर्ज देण्यापुरताच बघितला जातो. गरीब कुटुंबांनी एकत्र यावे, सामुदायिक धनसंचय करावा आणि त्यातूनच एकमेकांना गरजेप्रमाणे, सहकार्य करावे एवढेच बचत गटाचे उद्दिष्ट नाही.  विशेषतः महिलांचे बचत गट करण्यामागे दुसराही महत्त्वाचा हेतू आहे. तो म्हणजे महिला सक्षमीकरणाचा! बचत गटामुळे चार चौघींनी एकत्र यावे. कोणाच्या तरी घरी मीटिंग घ्यावी. मीटिंगमध्ये आर्थिक व्यवहाराबरोबरच महिलांच्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा व्हावी असे गृहीत आहे, पण महिला बचत गटांमधून असे काही घडत असल्याचे जाणवत नाही. पाच-दहा हिला बचत गटांनी याबाबत ही भरीव विचार केला असेलही. परंतु बहुतेक गटांतून कर्ज वाटप, सब्सिडी आणि काही काळापुरतीरोजगार उपलब्धी यापुढे हे गट सरकलेले नाहीत. सामुदायिक उद्योग करणाऱ्या गटांची अवस्थाही फारशी आशादायक करणारी नाही.  महिला बचत गटांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नावर जाणीव जागृतीच्या कामास प्राधान्य दिले पाहिजे. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची, कुटुंबात होणाऱ्या पिळवणुकीची किंवा छळणुकीची गटांतून चर्चा होणे गरजेचे आहे. शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची माहिती बचत गटातून दिली गेलीपाहिजे. योजना मिळविण्यासाठीच्या सर्व पद्धतींची माहिती अशा मीटिंग मध्ये मांडली. ६ / गाव झिजत आहे