पान:गाव झिजत आहे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. बचत गटांची गावबँक''''ठळक मजकूर'

 सध्या महाराष्ट्रात बचत गटांची चळवळ जोरात सुरू आहे. स्वयंसेवी संस्था,गावपातळीवरील कार्यकर्ते या कामात खूपच पुढाकार घेत आहेत. माविम, नाबार्ड,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यासारख्या संस्थांनीही त्यात आपला आर्थिक सहभागनोंदविला आहे. अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम आणि हरियालीच्या वतीने सुरू असलेल्या पाणलोट क्षेत्रविकासाच्या गावांतून बचत गट तयार करण्यावर भर दिला जात आहे.  बचत गटाची कल्पना तशी नवीन नाही. बांगलादेशात यापूर्वी असे काही प्रयोग झाले आहेत. छोट्या-मोठ्या शहरांतून “भीसी" चा प्रकार चालूच आहे. त्याचाही तोंडवळा थोडा बचत गटासारखा आहे. फक्त त्याची देवाण-घेवाण त्वरित होते. गरज असलेल्या सभासदाला सर्व सभासद आपली रक्कम देतात आणि त्याची गरज पूर्ण करतात. जमलेल्या रकमेवर थोडेफार अधिक पैसे लावून गरजवंत सभासद ती रक्कम घेतो आणि मूळ रकमेवरील जादा मिळालेली रक्कम सर्वजण वाटून घेतात. महाराष्ट्रातील राजगुरूनगर येथील डॉ. सुधा कोठारींच्या चैतन्य संस्थेने या बाबतीत पुढाकार घेतला आणि बचत गटाला एका चांगल्या संघटनेचे रूप दिले. आता तर केंद्रशासनाच्या S.GS.Y. या योजनेअंतर्गत बचत गटातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला वैयक्तिक व सामुदायिक उद्योग करण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बचत गटाचा परिचय गावागावात आणि शहरातही वाढला आहे. बचतगट कसा करावा? कोणी करावा? बचत किती करावी ? हा स्वतंत्र विषय आहे. बचत गटाचे आर्थिक व्यवस्थापन हा त्या विषयाचा महत्त्वाचा भाग आहे. बचत गटामुळे कळाले.

गावबँक/५