पान:गाव झिजत आहे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेकडो गावांतून समाजमंदिर, शाळेच्या खोल्या, रस्ते, पूल, व्यायामशाळा अशा इमारती गावात उभ्या राहिल्या आहेत. म्हणून यापुढच्या काळात आमदार-खासदार फंडातून एखाद्या गावी गावातील कर्मचाऱ्यांसाठी आठ-दहा घरांचे संकुल उभे केले आणि या संकुलाचा वापर कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी केला, तर कर्मचाऱ्यांच्या निवासाची अडचण सहज दूर होऊ शकते. साचा:GAPबीड जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्री. जयसिंगराव गायकवाड पाटील यांचेकडे आम्ही ही कल्पना मांडली. त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले आणि प्रयोग म्हणून एखाद्या गावात आपल्या खासदार फंडातून अशा प्रकारचे संकुल उभारण्याचे तत्त्वतः मान्यही केले. मोरफळी या गावाने घरा-घरातून पट्टी जमवून ग्रामपंचायतीच्या नावे ४०-५०गुंठे जमीन घेण्याचे ठरविले आहे. या जमिनीवर जिल्ह्याच्या खासदार फंडातून गाव कर्मचाऱ्यांसाठी निवास संकुल तयार झाले तर गावासाठी नेमलेला कर्मचारीवर्ग गावात राहील. त्यांच्या पगाराचा पैसाही गावातच खर्च होईल. संकुलाचे भाडे ग्रामपंचायतीला मिळेल. ते ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन राहील. कर्मचाऱ्यांना गावात राहावे लागल्यामुळे त्यांचा गावकऱ्यांशी सतत संपर्क राहील. कामातील दिरंगाई टळेल, भ्रष्टाचाराला बराच आळा बसेल. गावांची आर्थिकआणि सामाजिक धूप कमी होण्यास मदत होईल. {{PARAGRAPH ४/ गाव झिजत आहे