पान:गाव झिजत आहे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साचा:Center१. गावातला नोकर गावात साचा:Gapगेल्या आठवड्यात मोरफळीच्या सरपंचांनी गावात बोलावले होते. त्या दिवशीसकाळी त्यांनी ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेत गावचा सरकारी नोकर गावातच सहकुटुंब राहिला तर गावाला काय लाभ होईल, यावर गावकऱ्यांसमोर माझी मते मांडावीत व त्यांच्याशी चर्चा करावी, अशी त्यांची माझ्याकडून अपेक्षा होती. साचा:Gapमहाराष्ट्रात ४२५०० पेक्षा अधिक गावे आहेत. बरीच गावे स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. अशा ग्रामपंचायतींची संख्या २७६१४ एवढी आहे. जिल्ह्यात शांतता,सुव्यवस्था नांदावी आणि शासनाच्या विविध खात्यांचा कारभार नीट चालावा म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक विभाग कार्यरत आहेत. त्या त्या खात्याचा अधिकारी जिल्हाभर आपल्या खात्याचे काम कसे पोहोचेल याची दक्षता घेत असतो. महसूल खात्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो. तहसीलदार तालुक्याच्या ठिकाणी राहतो. तर या खात्याचा शेवटचा माणूस म्हणजे तलाठी हा नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीच्या गावातच राहावा अशी या खात्याची व्यवस्था आहे. बहुतेक खात्यांची व्यवस्था अशी आहे की, त्या खात्याचा शेवटचा कर्मचारी गावपातळीपर्यंत पोहोचलेला असावा; म्हणूनच जिल्ह्याच्या व्यवस्थापनात आणि विविध विकास योजना गावापर्यंत पोचविण्यात गावपातळीवरील कर्मचाऱ्याचा मोठा वाटा असतो. साचा:Gapग्रामपंचायतीचा विचार केला तर असे लक्षात येईल की, शाळेचे शिक्षक,अंगणवाडीची शिक्षिका, ग्रामसेवक, तलाठी, दवाखाना असेल तर डॉक्टर्स,परिचारिका, दाई किंवा V.H.W, लाईटमन, कृषी पर्यवेक्षक इ. इ. कर्मचारी नेमून दिलेल्या गावांत कार्यरत असतात. >  साचा:Rightगावातला नोकर गावात/