पान:गाव झिजत आहे.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रामीण जीवनाच्या सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकणारेआणि ग्रामीण पुनर्रचनेबाबत मार्गदर्शन करणारे उद्बोधक पुस्तक- गांव झिजत आहे. -ग. प्र. प्रधान लेखकाविषयी  डॉ. द्वारकादास लोहिया यांचा जन्म पाटोदा, ता. अंबाजोगाई जि. बीड या गावात ०७ सप्टेंबर १९३८ साली झाला. कुटुंबातून स्वातंत्र्याचे संस्कार झाले. अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेत शिकत असताना आचार्य ग. धो. देशपांडे व किंबहुने गुरूजींनी राष्ट्र सेवा दलाचे संस्कार त्यांच्या मनात पेरले आणि रुजवले, तेच पुढे पिडीत, शोषीत ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी समविचारी सहकाऱ्यांसमवेत मानवलोकच्या रूपाने अंकुरले.  १९७२चेदुष्काळविरोधी आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन, भ्रष्टाचार विरोधी मोहीम, मंत्र्यांना गावात प्रवेशबंदी, भ्रष्ट पोलीस व अधिकाऱ्यांना नजराणा अशा उपक्रमात पुढाकार व नेतृत्व. यामुळे अनेकदा तुरुंगवास. १९७५च्या आणीबाणीत १८ महिने गजाआड.  ग्रामीण विकासाचे काम करताना परदेशात झालेले विकास कार्य आपल्या परिसरात राबविण्याच्या भूमिकेतून इस्राईल, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अमेरिका, कॅनडा, नेदरलॅन्ड, इंग्लंड, हॉलंड, इ. देशांना भेट. ग्रामीण विकासाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित. पाणी आणि शेती हा जिव्हाळ्याचा विषय. विविध परिषदा, व्याख्यानमाला, चर्चासत्रे इ. माध्यमातून प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी, विविध वर्तमानपत्रे, मासिके यातून लिखाण. मेशपालन आणि लोकरउद्योग, पंचायत राज, मराठवाडा दुष्काळ, शोचनीय शौचालये, ग्रामपंचायतीत महिलांचा सहभाग इ. पुस्तिका प्रकाशित.