पान:गाव झिजत आहे.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एस्.ए.झेड प्रकल्प राबविल्यामुळे वसाहतवाद निर्माण होण्याचा प्रश्नच संभवत नाही,प्रयोग म्हणून मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून पंधरा वीस हजार हेक्टर सलग भूभागआणि गावे निवडून गावचा सर्वांगिण विकास एस्.ए.झेड च्या कल्पनेतून राबवावा.अशा छोट्या छोट्या प्रकल्पातून ग्रामव्यवस्थेला बळकटी येईल. एस्.ए.झेड हीभारय लोकशाहीच्या विकेंन्द्रित अर्थव्यवस्थेला बळकट करणारी, पंचायत राजव्यवस्था मजबूत करणारी असेल. यामुळे खेड्यातला माणूस खेड्यातच राहील तोहीसुखाने.  शिक्षण देखील वरचेवर महागडे होत चालले आहे. विविध क्षेत्रांत नव्याशासकीय शिक्षण संस्थांची संख्या वाढविण्याचे शासनाने बंद केले आहे,खासगीकरणाला प्राधान्य दिले आहे. खाजगी संस्था चालविणारे सत्ताधारी किंवाश्रीमंत वर्गातले असल्यामुळे त्यांना अशा संस्था चालविणे सोपे आहे. भरमसाठ फीआकारल्यामुळे आणि टेबलाखालून पैसे गोळा करण्याची पध्दत सुरू झाल्यामुळेतांत्रिक किंवा आरोग्य शिक्षण घेणे गरिबांना कठीण झाले, गरीब कुटूंबातूनही बुध्दिमानतरूण आहेत मात्र आजच्या या खाजगीकरणाच्या युगात त्यांना उच्च शिक्षण घेणेपरवडणारे नाही यामुळे ग्रामीण भागातील बुध्दिवंत तरुणांची पिढीच बरबाद होते कीकाय अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.  वंचीताना उच्च शिक्षणाची संधी कल्पना राबवून देता येईल. महागडयाशिक्षणपध्दतीमुळे गरीब विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची पाळी येते असेल तर मधल्याविद्यार्थ्यासाठी शासनाने दत्तक योजना सुरू करावी. अशा तरुणांच्या शिक्षणावरहोणारा खर्च शासनाने करावा, शिक्षण संपल्यावर त्याला नोकरीची हमी द्यावी. त्यालामिळणाऱ्या पगारातून हप्त्या हप्त्याने शासनाने त्यांच्यासाठी केलेला खर्च वसूल करावा, असे केले तरच गरीब विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि त्याच्या बुध्दीचा उपयोग देशघडविण्यासाठी होईल. १००/ गाव झिजत आहे.