पान:गाव झिजत आहे.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याशिवाय मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा स्वतंत्र विचार केल्याशिवाय त्याभागाचा विकास होणे शक्य नाही. सध्या एस्.ई.झेड चा बोलबाला आहे. भारतातीलविविध प्रांतांत एस्.ई.झेड च्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन सलग खरेदीकरण्यासाठी उद्योगपतींची धावपळ सुरु आहे. शासनही त्याला प्रोत्साहन देत आहे.एस्.ई.झेड मुळे उद्योग वाढला तर हजारोंना रोजगाराची संधी मिळेल असे सांगितलेजाते. उद्योगपतींना उद्योग त्वरित उभा करता यावा आणि त्या उद्योगाला त्वरित बरकतयावी म्हणून सवलतीच्या दरात या उद्योगक्षेत्राला लागणारे पाणी, वीज खात्रीनेउपलब्ध करून देण्यात येत आहे. आयात निर्यातीवर सवलत दिली जाणार आहे.शिवाय त्यांच्या उद्योगक्षेत्रात कोणाचाही हस्तक्षेप नको म्हणून लुडबूड करणाऱ्यावरबंधने घातली जाणार आहे, थोडक्यात एस्.ई.झेड म्हणजे स्वायत्त, स्वतंत्र असेउद्योगपतींचे राज्यच. अशा क्षेत्रात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळू शकणारनाही असे बोलले जाते. एस्.ई.झेड चा मुख्य गाभा लक्षात घेता तशाच प्रकारचा प्रयोग एस्.ए.झेड चीकल्पना राबवून करता येण्यासारखा आहे. एस्.ए.झेड म्हणजे स्पेशल अॅग्रीकल्चरलझोन मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा आणि शेतीचा विकास एस्.ए.झेड ही कल्पनावापरून करता येण शक्य आहे. एस्.ए.झेड साठी ए स्.ई.झेड प्रमाणेच पंधरा वीस हजारहेक्टरचा सलग दुष्काळी भूप्रदेश निवडावा. या सर्व भूप्रदेशाचा पाणलोट क्षेत्रविकास करावा. या प्रदेशावर पडणाऱ्यापावसाची नोंद घेऊन जागोजागी पाणी अडवावे, जुन्या विहिरी दुरुस्त कराव्यात, शक्यतेथे नव्या विहिरी घ्याव्यात, छोटी मोठी धरणे, बंधारे बांधावेत, जुनी धरणे आणिबंधाऱ्यांची दुरुस्ती करावी. त्यातील गाळ धरणाच्या वा बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रावरपसरावा. त्यामुळे या क्षेत्रावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त शेतीसाठी करता येईल. पाण्याचा काटकसरीने वापर व पिकास लागणाऱ्या पाण्याचाहिशेब शेतकऱ्यांना शिकवावा. गाळ टाकल्यामुळे पहिली काही वर्षे शेतकऱ्यालारासायनिक खते वापरण्याची गरज पडणार नाही. त्याचा खर्च वाचेल.एस्.ए.झेड मध्ये समाविष्ट असलेल्या गावांसाठी बँकांनी सवलतीचे धोरण स्वीकारावे. खरीप आणि रब्बीसाठी शेतकऱ्यांना बँकांनी दरडोई पाच-सात रुपयेबियाणे खत खरेदी करण्यासाठी अनामत म्हणून द्यावे. त्याची फेड त्याने हंगामसंपल्यावर करून घ्यावी. ही अनामत रक्कम म्हणजे कर्ज नसावी. त्याचे स्वरूपमराठवाड्याच्या विकासासाठी 'साझ' हवा / ९७