पान:गाव झिजत आहे.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

2 सहभाग हळूहळू कमीच होत आहे. दोन हजार वर्षांपूर्वी आपला जागतिक व्यापारातीलहिस्सा हा ३५% होता. १७ व्या शतकात तो १८% वर आला, आणि आज तो केवळएक टक्क्यावर येऊन पोहचला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊनच मराठवाड्यातीलशेतीचा विचार करावा लागेल.  मराठवाड्याचे भौगोलिक क्षेत्र ६४०४० चौ. कि. मी. आहे. एक चौ. कि. मी.म्हणजे १०० हेक्टर असे गणित लावले तर मराठवाडा हा ६४.४० लाख हेक्टरवरपसरलेला आहे. या क्षेत्रापैकी ३६.४६ लाख हेक्टर खरिपाचे, २०.६९ लाख हेक्टररब्बीचे आणि उर्वरित क्षेत्र डोंगर, पडिक जमीन, नद्या, नाले, धरणे, रस्ते, शहरे आणिवस्त्या यांनी व्यापलेले आहे. शिवाय मराठवाड्याच्या ३८-४० टक्के भूभागावरदुष्काळाची छाया पडलेली असते.मराठवाड्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्रच मोठे आहे. १९९१ च्या आकडेवारीप्रमाणे मराठवाड्यात २२.४० लाख खातेदार आहेत. बारकाईने याचेविश्लेषण केले तर असे लक्षात येते की या खातेदारांपैकी ७.४५ लाख खातेदाराकडेदोन हेक्टरच्या आत जमीन आहे. त्यापैकी ७५ टक्के जमीन ही कोरडवाहूच आहे. कोरडवाहू जमीन याचा अर्थ वर्षांतून एकदाच उत्पन्न देणारी जमीन. याचा दुसरा अर्थअसा की, कोरडवाहू शेतकऱ्याला त्याच्या स्वत:च्या जमिनीवर बाराही महिने कामनसते. पण त्या जमिनीतील उत्पादनावर आणि उत्पन्नावर त्याचा वर्षभराचा संसारभागणे कठीण असल्यामुळे त्याला जगण्यासाठी दुसरा उद्योग किंवा मजुरी करावीलागते. ती त्याला हमखास मिळतेच असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही.म्हणूनच अशा शेतकरी वर्गात दारिद्रयाचे, र्जबाजारीपणाचे आणि आत्महत्यांचेप्रमाण वाढत आहे.मराठवाड्याचा विकास कोणासाठी असा प्रश्न कोणी विचारला तर कोरडवाहूशेतकऱ्यांसाठी असेच म्हणावे लागेल. दुय्यम स्थानावर सिंचनाची व्यवस्था असलेला शेतकरी किंवा कारखानदार, उद्योगपतीही, असू शकेल. मराठवाड्याचा विकासकरावयाचा असे तर मराठवाड्यातील शेतीचा विकास हे सूत्र विसरून चालणार नाही.शेतीचा विकास करताना कोरडवाहू शेतकऱ्यांच्याच शेतीच्या विकासाला प्राध्यान्यद्यावे लागेल. असा विकास करावयाचा असेल तर काही गोष्टींचा वेगळ्या पद्धतीनेविचार करावा लागेल. शासन गेली पन्नास वर्षे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवीतअसले तरी त्या योजनांचा फायदा अभावानेच कोरडवाहू गरीब शेतकऱ्यांना झालामराठवाड्याच्या विकासासाठी 'साझ हवा / ९५