पान:गाव झिजत आहे.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१. मराठवाड्याच्या विकासासाठी 'साझ' हवा

सध्या शेतीच्या धोरणावर देशभर चर्चा सुरू आहे. केंद्र शासनाने शेतीसंबंधीचेनवे धोरण चर्चेसाठी संशोधक सदस्यांपुढे ठेवले आहे. कारण स्वातंत्र्यानंतर कधी नव्हेएवढी घसरण शेतीक्षेत्रात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्नघसरत आहे. जपानसारख्या देशात सामान्या माणसाचे दरडोई उत्पन्न ३६ हजार पौंडआहे. तर भारतामध्ये ते फक्त ६०० डॉलर एवढे आहे. इलेक्ट्रॉनिक्स किंवा सॉफ्टवेअरमध्ये ३० टक्क्याने वाढ झाली. ऑटोमोबाइल्स्, टेलीकम्युनिकेशन, व्यापार,पर्यटन आदी क्षेत्रांत जवळपास १५%नी वाढ झाली. मात्र शेतीक्षेत्राचा विकास केवळदोन टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. शेतीक्षेत्र आणि इतर क्षेत्रांतील विकासाचे अंतरवाढत आहे. या संदर्भातच मराठवाड्यातील विकासाचा विचार करावा लागेल.  गेल्या ६० वर्षांचे भारतीय शेतीसंदर्भात अवलोकन केले तर असे लक्षात येईलकी, आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या देशावर कोणाचेही कर्ज नव्हते. हळूहळूपरिस्थिती बदलली. जरी भारत आज अनेक पिकांमध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकातअसला तरी शेतीक्षेत्रातील परिस्थिती ढासळली आहे. मध्यंतरी आपण अन्नधान्याबाबतस्वयंपूर्ण झालो होतो. आता ती स्वयंपूर्णता धोक्यात आली असून गतवर्षी ५० लाख टनगहू बाहेरून आयात करावा लागला. एवढेच नव्हे तर सध्या अन्नधान्य, कडधान्य,खाद्यतेल अशा जीवनावश्यक किमान दोनशे वस्तू परदेशातून आयात करण्यात येतआहेत. जागतिक व्यापाराचा भाग म्हणून हे करावे लागत आहे असे शासन सांगते.शासनाने घेतलेली ही दिशा चुकीची असल्यामुळे जागतिक व्यापारातसुद्धा आपलामराठवाड्याच्या विकासासाठी 'साझ' हवा / ९३