पान:गाव झिजत आहे.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बऱ्याच अंशी कमी होईल. पेरणीच्या काळात बियाण्यांच्या खरेदीसाठी त्यालाकोणाकडेही हात पसरावे लागणार नाहीत. कर्जाचा डोंगर वाढणार नाही. बियाण्यांप्रमाणेच खतावरही शेतकऱ्यांनी गेल्या २५-३० वर्षांत भरपूर खर्चकेला आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढते हे त्याला कळल्यावरमहागडी रासायनिक खते डावलून चालणार नाही. सेंद्रिय खताबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तळ्यातील गाळ शेतात टाकण्याचे छोट्या शेतकऱ्यांना सहकार्यशासनाने करावे. देशातील धरणांपैकी महाराष्ट्रात ४५% धरणे आहेत. याशिवाय पाझरतळी आणि सिमेंट नाला बांध हजारोंच्या संख्येत आहेत. सिमेंट नाला बांध आणि पाझरतलावात पाण्याइतकीच कॅचमेंट एरियातून माती वाहून आली आहे. लाखो टन मातीदरवर्षी या तळ्यांत येऊन साठत आहे. दरवर्षी किंवा तळी कोरडी पडल्यावर त्यातील माती नाममात्र खर्चाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात टाकली तर पहिली दोन-तीन वर्षेत्या शेतकऱ्याला शेतात कोणतेही खत टाकण्याची गरज भासणार नाही, असामानवलोकचा अनुभव आहे. ऐपत नसलेल्या छोट्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतात हेमातीचे धन योग्य प्रमाणात टाकण्याचे नियोजन शासनाने केले तर हजारो अल्पभूधारककोरडवाहू शेतकऱ्यांचा खतावरील होणारा खर्च वाचेल. सलग दोन-तीन वर्ष खर्च वाचला तर त्याची कौटुंबिक परिस्थिती सुधारेल. तो आर्थिक संकटातून सावरला कीत्याच्या जगण्याला अर्थ येईल. तो आत्महत्येपासून दूर राहील. . ९२/ गाव झिजत आहे