पान:गांव-गाडा.pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४      गांव-गाडा.


शक्य तितकी विस्तृत व वर्गवार यादी खालील टीपेंत दिली आहे.* तिच्यांतील निरुपयोगी वतनदारांच्या नामावळीकडे लक्ष दिले असतां आठशें लष्कर आणि नऊशे न्हावी अशी अनवस्था झाल्याचे दिसून येईल. हे सर्व वतनदार दरएक गांवांत होते किंवा आहेत अशांतला भाग नाहीं; तरी पण वतनदारी किती फोफावली ह्याची कल्पना करण्याला ही यादी पुष्कळ उपयोगी पडेल.

-----

 *(१) सरकारउपयोगी वतनदार-पाटील, राव, खोत, गावडा, गांवकर, नाईक, शेटी. मुकादम, ग्राममनसुबो, मुखी, मत्तादार, वाडेरो इत्यादि.

 कुळकर्णी, पांड्या, पटवारी, निसुंदा, तलाठी,कर्णिक,शानभोग, ग्राममिरासीदार, पट्टामणी, करणम्, तापेदार इत्यादि.

 महार, धेड, वेसकर, कारभारी, वल्हेर, मांदगेरू, तराळ, जागल्या, चौगुला, कोळी, भील, रामोशी, मांग, हवालदार, जमादार, नाईकवाडी, रखवालदार, पगी, शेतसनदी, कोतवाल, गस्ती, तळवार, अंबीकार, कोलेगार, मधवी, कोरभू, गडकरी, तशदार, शिपाई, वालीकर, बारकेर इत्यादि.

 (२) रयतउपयोगी वतनदार-जोशी, गुरव, जंगम, जैनोपाध्याय, काजी, मुलाना, खतीब, मुजावर, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, आंबेकरी, हळकरी इत्यादि

 (३) ज्यांच्या चाकरीची इंग्रजसरकाराला व त्यांच्या रयतेला जरूर नाहीं असे वतनदार-पोतदार ( सोनार ), शेकदार, महाजन, दलाल, शेटे, घाटपांड्ये, निरखदार, चौधरी, डांगे, दानगट, औटी, मुसरीफ, पथकी, पखाली, जिनगर, मेंढगार, थळेकरी, बेलदार, शिकलदार, नावाडी, न्हावी, तांबोळी, परीट, शिंपी, तेली, माळी, गवंडी, कासार, पिंजारी, भाट, ठाकूर, वाजंत्री, घडशी, जोगी, भुत्या, गोसावी, बैरागी, पुजारी, वाघ्या, मुरळी, जोगतिणी, हिजडे, मुंढ्या, डवऱ्या, भराडी, गोंधळी, भगत, घुगरी, पोतराज, फकीर, भोई, वाटाडे, पानडे, गारपगार, डोलीवाले, कलावंतीण, पाट साफ करणारे इत्यादि.