पान:गांव-गाडा.pdf/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वृत्ति      ३९


अमुक वसूल व अमुक चाकरी घेण्याचा ठराव करून गावाच्या दिमतीला सबंध काळी-पांढरी लावून दिल्यामुळे गांवांनाही जरूरीप्रमाणे इनाम देण्यास ऐपत व मुभा होती. तेव्हां इनामांचे दोन भाग पाडतात-सनदी आणि गांवनिसबत. राजाने दिलेल्या इनामांना सनदी म्हणतात व गांवजमिनींतून किंवा गांवच्या उदिमावर अगर प्राप्तीवर गांवाने दिलेल्या इनामांना गांवनिसबत इनाम म्हणतात. इनाम देण्याचे मुख्य हेतु दोन- चाकरी आणि मेहरबानी. जे स्वतः किंवा ज्यांचे पूर्वज विशेष रीतीनें सरकाराच्या कामास आले, किंवा मर्जीस उतरले त्यांना पारितोषक, म्हणजे कोणत्याही प्रस्तुत अगर भावी चाकरीची अट न घालता जे इनाम देण्यांत आले ते कृतज्ञतापूर्वक किंवा मेहरबानीखातर दिलेले इनाम होत. हे इनाम जात-इनामांत मोडतात. राजघराण्यांतील किंवा सरदारघराण्यांतील लोकांनाही आपापल्या इभ्रतीप्रमाणे राहता येण्यासाठी इनाम दिलेले आहेत. नोकर-इनामांचे ठोकळ तीन भाग पडतातः (१) सरकारच्या लष्करी किंवा मुलकी नोकरीच्या शर्तीवर दिलेले जागीर, फौजसरंजाम, अगर जातसरंजाम यांसारखे इनाम ('जा' किंवा 'जै' म्हणजे जागा, नेमणूक; 'गिर' म्हणजे प्राप्त होणे. 'सरंजाम' म्हणजे सामुग्री, सामान. मुसलमानांनी दिलेल्या इनामांना जागीर अथवा जहागीर व मराठ्यांनी दिलेल्या इनामांना सरंजाम म्हणत. सरंजाम व जहागीर ह्यांमध्ये विशेषसा फरक नाही.); (२) देऊळ, समाधि, मशीद, दर्गा वगैरेंमधील पूजाअर्चा, दिवाबत्ती, झाडसारवण, उत्सव, यात्रा, उरूस, हगामे यांसारखे समारंभ, इत्यादि चालविण्यासाठी दिलेले धर्मादाय किंवा देवस्थान इनाम; (३) गांव, महाल, परगण्याची महसुली, फौजदारीसंबंधानें गांवकी व घरकी कामें करणाऱ्या गांवकामगारांना व परगणे अंमलदारांना दिलेले इनाम. इनाम म्हणून जे काही देण्यात आले ते काळीचे उत्पन्न-स्वामित्व नव्हे-म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार, किंवा इनाम जमीन धारण करणारांना महसुलाची सर्वस्वी अमर अंशतः सूट देण्यात आली. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. प्रत्यक्ष