पान:गांव-गाडा.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भरित

१५


वगैरेंना अठरा नारू किंवा आलुतदार म्हणतात. स्थल-कालपरत्वें आलुत्ये बलुत्यांत चढले व बलुत्ये आलुत्यांत उतरले, आणि कोठे कोठे उपरिनिर्दिष्ट कारूनारुंपैकी काहींना आलुत्याबलुत्यांच्या पंक्तीत मुळीच थारा नाही. बहात्तर रोग आहेत असे म्हणतात, त्याप्रमाणेच गांवाला बारा बलुत्ये व अठरा आलुत्ये असें म्हणण्याची वहिवाट आहे. बाकी वस्तुस्थितीचा ह्या संख्येशी मेळ नाही, हे कारूनारूंची विस्तृत यादी गांव-मुकादमानी ह्या प्रकरणांत दिली आहे, तिजवरून स्पष्ट होते.

 गांवचे आंधळे, पांगळे, महारोगी वगैरे विकल व पंगू लोक हक्कदार भिक्षुकाप्रमाणे काळी-पांढरी उकळून आपला निर्वाह करतात; आणि एकप्रकारे हक्कदार बनतात. सर्व गांवकऱ्यांना, मग ते कोणत्याही धंद्यावर पोट चालवोत, वतनदार ही सामान्य संज्ञा आहे. वरील स्थाईक वतनदारांखेरीज गांवाला ओवांड्याचे (परगांवचे) फिरस्ते वतनदार असतात. सर्व प्रकारचे व दर्जाचे व्यापारी, निरनिराळे तीर्थोपाध्याय, मंदिरवाले, दरगेवाले, फिरस्ते, हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे, भिकार, चोरटे, वगैरे लोकांचा ज्या गांवांशी वंशपरंपरेचा संबंध जडतो, ते ती गांवें वांटून घेतात; आणि वांटणीच्या गांवांत आपला रोजगार पिढ्यानपिढ्या चालवितात. तेही आपणांला वतनदार म्हणवितात, आणि गांवचे स्थाईक वतनदार त्यांना याच नात्याने वागवितात. कदीमच्या फिरत्या वतनदारांप्रमाणे उपलाणी गोसावी, बैरागी, फकीर, जंगम, मानभाव, आंधळे, पांगळे वगैरे भिक्षुक, गोपाळ, कोल्हाटी, गारोडी, ह्यांसारखे तमासगीर कांहीं गांवीं कायमची वस्ती करून वतनदार झाले आहेत. काहीजण फिरता फिरतां कमाईची गांवें टेहाळून ठेवतात, आणि वर्ष दोनवर्षी त्या गांवीं टाकले उतरतात. ह्याप्रमाणे पायरवा घालून ते हळुहळू वतनदार बनतात, ते इतके की लोक त्यांची मुदतीप्रमाणे वाट पाहतात, आणि ते आले नाहीत, तर हळहळतात. एका गांवीं फार दिवस राहिलेल्या एका ख्रिस्ती पालकाने आपण करीत असलेल्या लोकसेवेबद्दल आपला तीन चार महिन्यांचा पंचेचाळीस की साठ रुपये पगार सदरहु गांवांत