पान:गांव-गाडा.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायात्रा.      २८३

निघेल, तेथें तितकें त्यापासून काढण्याला कोणीही कमी करीत नाही. प्रयागवाळ, गंगापुत्र व गयावळ हे एकाचे एक असल्यामुळे प्रयागास कमी पडले तर त्याची कसर काशीस निघते, आणि तेथेही कमी पडले तर त्याच्या दिढीदुपटीचा वचपा गयावळ यात्रेकरूंकडून पिळून काढतात.

 हिंदुस्थानीपेक्षां दाक्षिणात्य ब्राह्मण आचार-कांडांत तरबेज आचारसंपन्न व वैदिक याज्ञिक विद्येत चांगले निष्णात असतात, ही गोष्ट सर्वसंमत आहे; आणि त्यामुळे महाराष्ट्रीच काय पण दक्षिणेमध्ये वापरलेले मारवाडी, गुजराती यात्रेकरू देखील महाराष्ट्री सांगता उपाध्याय मिळविण्यास उत्सुक असतात. प्रयागवाळ व गयावळ ह्यांच्याकडे त्यांच्या पुठ्यांतले महाराष्ट्रीय उपाध्याय कसेबसे अजून मिळतात. परंतु काशीत दाक्षिणात्य ब्राह्मण व गंगापुत्र ह्यांच्यामध्ये वाद चालू आहे. दाक्षिणात्यांचे म्हणणे असें आहे की, काशींत मणिकर्णिकेशिवाय गंगापुत्रांना पौरोहित्य नाही असें सरकारदरबारी निवाडे झाले आहेत. सबब गंगापुत्रांकडे यात्रेकरू उतरला असतां महाराष्ट्रीय ब्राह्मण कर्म चालविण्याला येत नाही, आणि तें यथासांग करण्याची अडचण पडते. अशी स्थिती आहे तरी गंगापुत्राकडे महाराष्ट्रीय ब्राह्मण मिळतील, अशी थाप सरकतीचा स्वार्थ साधण्यासाठी भरेकरी व प्रयागवाळ यात्रेकरूला बेलाशक मारतात; आणि ते त्याला सरकतदार गंगापुत्राकडे नेऊन गुदरतात. सकृदर्शनी गंगापुत्रही छातीला हात लावून सांगतो की, मी दक्षिणी ब्राह्मण आणून देतो; आणि तो आयत्या वेळेला तोंडघशी पाडतो, तेव्हां यात्रेकरूला ह्या परस्परसाह्यकारी टोळीच्या लबाडीची पहिली ठोकर लागल्यासारखी होते. 'आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा झाली धनी' ॥'कथड्याशी कैंचा

-----

 १ मुंबईकडील एका ह्माताऱ्या कोळणीने सांगितले की, 'मी गंगेवर येतें न येते तोच उपाध्यायाने माझा हात धरला. मला वाटले तो मला हात देतो. पण पहाते तो त्याने तो एका कालवडीच्या शेपटीला लावला व ह्मणाला की तूं गोप्रदान केलें, आठ रुपये टाक; गाईला हात लावल्यावर नाही कसे म्हणावे असे माझे मनांत येऊन मी चुंबीत आठ रुपये काढून दिले.