पान:गांव-गाडा.pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८२      गांव-गाडा.

भासवितात. अगोदरच फुगलेल्या आमच्या भिक्षुकांच्या संख्येत ह्याप्रमाणे सहस्रावधि भर पडली, व तिच्यायोगाने यात्राभरतीचे काम झपाट्याने व मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ज्याप्रमाणे पलटणीच्या तुकड्या अंमलदाराच्या मागे चालतात त्याप्रमाणे दक्षिण प्रांताचे हजारों शेतकरी, सोनार, कासार, सुतार, लोहार,साळी,माळी, धनगर, वगैरे गांवढेकऱ्यांंच्या झुंडीच्याझुंडी लाठीवाल्या भरेकऱ्याच्या मांगें चालतात. तो त्यांना आपल्या मालकाच्या अथवा भागीदाराच्या घरी नेऊन गुदरतो, त्यांच्या जवळपास आपला चौका देतो, आणि आपल्या कळपांतले लोक कोठेही बाहेर जावयाला निघाले तर त्यांचे पुढे पहारेकऱ्याप्रमाणे चालतो. त्याचे ऐटदार पाऊल आणि त्याचे मागे आमचे लोकांची मेंढ-माळ पाहिली म्हणजे आम्ही किती व कसे परवश होतो ह्याची तीक्ष्ण प्रतीति येऊ लागते.

 यात्रेकरूला वाटते की परमुलखांत अल्पसंतुष्ट व माहीतगार वाटाड्या मिळाला, सबब आतां ठिक ठिकाणचा निरख माहीत नसल्यामुळे जी फसवाफसवी व्हावयाची ती होणार नाही. आपण आडत्ये आहोत हे भांडे फुटले नाहीं तोंवर गिऱ्हाईक बिचकणार नाही आणि आपला व्यापार अप्रतिहत चालेल हे भरेकरी जाणून असतो. त्यामुळे स्टेशन, धर्मशाळा वगैरे ठिकाणचे नोकर, दुकानदार, गाडीवान, हमाल इत्यादि सर्वांची तोंडदाबीं केल्याखेरीज त्याला गत्यंतर नसते; आणि त्याच्या सल्ल्याने यात्रेकरूचे एका पैशाचे ठिकाणी दोन तीन देखील जातात. ते, उपाध्ये व त्यांचे इतर नोकर यात्रेकरूंशी 'अन्नदाता, धर्मावतार' इत्यादि मिष्ट भाषण करतील, ह्या मुलखाचे सर्वच लोक बदमाष म्हणून त्यांबद्दलचा ओठापासून तिटकारा दाखवतील, परंतु त्यांनी तोंडावाटे काढलेले दाम वाजवी अंकावर उतरविणार नाहीत; उलट तितकेचे तितके देण्याची शिफारस करतील, आणि त्यातून आपली चोरटी हिस्सेरशी घेतील. आडत्यांनी जरी सांगितलें की आमचा मालक अल्पसंतोषी आहे, तरी त्याला नोकर, यात्रादलाल ह्या सर्वांचा खर्च काढावयाचा असतो. म्हणून जेथे ज्यापासून जितकें