पान:गांव-गाडा.pdf/286

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाट-चाल.      २६५


घालण्यापेक्षा ऐपतीप्रमाणे ते बाळगून हौस अगर धंदा करण्याची प्रवृत्ती बळावेल तर मोकार जनावरांकडन होत असलेली लोकपीडा दूर होऊन शेतीचा आनुषंगिक असा एक पशुपक्षीविक्रीचा धंदा कुणब्याला किफायतशीर रीतीने करता येईल.

 अनुभवाअंती सरकाराने जे कारूनारू निरुपयोगी ठरवून सरकारच्या व गांवच्या नोकरीतून वजा केले, त्यांना काळी-पांढरीत काहीएक हक्क देऊ नये. कालमानाप्रमाणे सर्व नारू व तिसऱ्या ओळीचे कारू-भट, गुरव, कोळी, सोनार, रामोशी, जंगम, मुलाना, ह्यांचे गावकीचे काम बहुतेक नाहीसे झाल्यासारखे आहे. दुसऱ्या ओळीचे कारू-कुंभार, परीट, न्हावी, मांग ह्यांनाही म्हणण्यासारखें गांवकीचे काम पडत नाhही. भराडी,गोंधळी, कार्याच्या वेळी गोंधळ व वाघ्ये, मुरळ्या,जागरण घालतात. सणाच्या दिवशी तांबोळी दमडीटोलीची विड्याची पाने देतो आणि गुरव दोन चार पत्रावळी टाकतो, पण त्याच्या वीस पंचवीस पट किंमतीचे वाढणेंं त्याच दिवशी दोघेही घेऊन जातात. अलीकडच्या फिरलेल्या काळात भट, जंगम, सोनार वगैरेंचे कामही फार जुजबी पडतें. मडकी, स्वस्त टिन व एनामेल वगैरेंची भांडी, साबण, दोरखंडे रोखीने मिळू लागली तशी कुंभार, परीट, मांग ह्यांच्या कामाला आटण कळा आली आहें. कुणब्याची हजामत सरासरीने पंधरा दिवस तें एक महिन्याने होतें, व मोठ्या माणसांच्या हजामतीस पाव अर्धा आणा पडतो. बरेच लोक डोकें ठेवू लागल्यापासून, व कांहीं कांहींनी स्वतः दाढी करण्याला सुरुवात केल्यापासून न्हाव्याचे काम पुष्कळ कमी होत चालले आहे. तेव्हा सर्व नारू आणि दुसऱ्या व तिसऱ्या ओळींचे कारू ह्यांची जरूर पडेल तेंव्हा त्यांना मेहनताना द्यावा. त्यांनी तो कितीही जास्त मागितला तरी वर्षानुवर्षे आलुतें बलुतें, वाणगी आणि सणावारांची वाढणी व पोस्त ह्यांपेक्षा तो खात्रीने कमी पडेल. पहिल्या ओळीपैकी चांभाराची गरज बागाईत शेतकऱ्यांना जास्त लागते. बहुतेक चांभारकाम विकत पडतें. तेंव्हा चांभारांचे सुद्धां बलुते काढून त्याला रोख मेहनताना देण्याचा परिपाठ घात-