पान:गांव-गाडा.pdf/257

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३६      गांव-गाडा.


न्माला जाशील तर तोलूं तोलूं मरशील इत्यादि; पण ठाकराच्या जन्माला जाशील तर जंगलचा राजा होशील." आणि जंगलचे राज्य कोणते म्हणाल तर ना अन्न ना वस्त्र; जंगलांतले कंद आणावेत व खावेत. सोप्या हुन्नरांविषयीं सुद्धा लोक म्हणतात 'जेनो काम तेनो थाय बिजा करे तो गोता खाय'. दिवसभर ढोरासारखी मेहनत करणारा कुणबी म्हणतो 'छे, घडीभर बसलें तर कमरेला टिपरूं लागते आणि हातापायाला कळा लागतात. बसून बसून माणूस उबून जाऊन फटफटीत पडावयाचें. ब्राह्मणांनींच प्रहरानुप्रहर मान वांकवून लिहीत बसावें.' कोल्हाट्या उड्या, दोरावर चालणे वगैरे कसरतीची कामें करणासऱ्या कोल्हाटणी म्हणतात 'घटकाभर तमाशा करून आम्ही दिवसभर बसून खायाला सोंकलों, तेव्हां आमच्याने दळणकांडण, खुरपणीमोडणी, कसची होते ?' परीट म्हणतात की दिवसभर भट्टीजवळ बसून रक्त जाळणे आमच्याने होणार नाही, आणि सुतार म्हणतात की बसून बसून चांभाराच्या टिऱ्या कशा डेऱ्यासारख्या होतात त्या पहा. हुन्नरी जाती परजातींच्या धंद्याबद्दल तरी नालायकी कबूल करतात. परंतु आयतखाऊ कारूनारू, भिकारजाती, रातोरात ५०-६० मैलांवर दरोडा मारून परत येणाऱ्या चोरट्या जाती साफ म्हणतात की, आमच्याच्याने हुन्नर किंवा धंद्याचे कष्ट होते तर देवाने ज्याचा जन्म त्याला कशाला लावला असता ? धंद्याची पात्रता

-----

 १ एंजिनियर खात्याच्या हमेषच्या दुष्काळी कामावर महार, मांग, भिल्ल, रामोशी वगेरे उडाणटप्पू जातीचे काम मापांत भरपूर पडडून त्यांना पगारही चांगला सुटतो. सन १९०६ सालच्या मे महिन्याच्या सुमारास विसापूर तलावाच्या दुष्काळी कामानजीकच्या एका गांवांत सुमारें ५०|७५ मांगगारोड्यांची एक टोळी उतरली. काळीपांढरीत हे लोक भीक मागण्याला आले, तर त्यांना काही दाणाचारा देऊं नये अशी आसपासच्या गांवकऱ्याना समज मिळतांच त्यांनी त्याप्रमाणे केलें व दुष्काळी अधिकाऱ्याने दररोज दुसांज पालांत जाऊन हटकणी लावली की, तुम्ही कामावर

[ पुढील पान पहा.]