Jump to content

पान:गांव-गाडा.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भरित.

श्रीरामचंद्रानें कनकमृग मारला व तो पडला म्हणून तो महारांनीं हक्कांनी नेला; ही कथा सांगून महार आपला मुख्य हक्क असा सांगतात कीं, आम्ही "पड्याचे धनी." कोणी म्हणतात, महार हा शब्द मेहतर याचा अपभ्रंश आहे, कोणी म्हणतात, तो महा + अरि (मोठा शत्रु) ह्या दोन संस्कृत शब्दांचें रूपांतर आहे. रा. रा. शिवरामपंत भारदे म्हणतात कीं, महाराचें मूळ "मह + अर" म्हणजे जंगलांत किंवा पर्वताच्या गुहेंत राहणारा अर्थात जंगल किंवा गुहेचा नाईक हें आहे, म्हणून त्याचें मुख्य काम वाटाड्याचें ठरलें. सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांच्या मतानें मृतहर (मेलेलें जनावर ओढणारा) ह्या शब्दापासून महार हा शब्द निघाला. "गोधन" हा संस्कृत समास पुराणप्रसिद्ध आहे. हिंदु लोक गाईला आई समजतात. गाई, म्हशी, बैल, रेडे, ह्या शेतोपयोगी जनावरांना शेतकरी लोक "लक्ष्मी" म्हणतात. उदाहरणार्थ, पाटलांजवळ दोन खंडी लक्ष्मी आहे, रानांत लक्ष्मीला पाणी भेटत नाहीं इत्यादि. वर सांगितलेल्या जनावरांचें मांस बहुतेक हिंदू खात नाहींत. महार मांग तें खातात; इतकेंच नव्हे, तर लोकप्रवादाप्रमाणें गुरांढोरांना विष घालून मारतात व पडें खातात. तेव्हां मा (लक्ष्मी, आई) + हर अशी महार शब्दाची व्युत्पत्ती संभाव्य दिसते. महार हा जातिवाचक शब्द असून व्यवसायवाचकही आहे, आणि असल्या अनेक जातींप्रमाणें महार ही संकीर्ण जात असावी. महार व मांग या दोन्ही जाती गांवाबाहेर राहतात, तरी 'बाहेरला' 'वेसकर' हे प्रतिशब्द महारालाच लावतात. दोन्ही जातींत ' नाईक' हें बहुमानाचें उपपद लावतात, व महारांमध्यें त्याचें 'नाक' हें रूप झालें आहे, उ०-खंडनाक, जाननाक. गांवकीच्या कामावर महारांप्रमाणें मांगांच्या साक्षीसह्या क्वचित आढळतात. आषाढांत कोणत्याही हिंदु जातीचीं लग्नेंं होत नाहीत; परंतु महारांची लग्रसराई मात्र आषाढांत असते. ह्या महिन्यांत महारकीचें काम फारसें नसतें, म्हणून समस्त गावकऱ्यांच्या सोईनें हा महिना महारांना लग्नकार्यांसाठी काढून दिला