पान:गांव-गाडा.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १८५


अशी जी अनेक ठिकाणी पिकाची नासाडी होते ती टळेल. ह्या प्रकारचे हत्याराचे परवाने देण्याचा अधिकार प्रांत मॅजिस्ट्रेटला दिला तर रयतेची सोय पुष्कळ वाढेल. हत्यारांच्या खालोखाल शेतकऱ्यांची दुसरी तक्रार कुंपणाबद्दल आहे. जंगलामुळे कुपाटीला फांटी मिळत नाहीत असें कुणबी कण्हतात. निवडुंगाचे कुंपण करावें तर त्याचा कांटा विषारी असून त्याखाली विंचू, साप राहतात, त्याला आग फार असते व त्याच्या वसव्यामुळे ५/१० हात जमिनीत पीक येत नाही. शेराचे कुंपण करावें तर त्याला आग असून त्याला जनावर खेटले म्हणजे अपाय होतो. एका शेताभोंवतीं १०।१२ हात रुंद व ६|७ हात खोल असा खंदक रानडुकरांसाठी केलेला दिसला. इतकी जमीन दरसाल अडविणे फायदेशीर नसले पाहिजे. जें झाड एका ठिकाणी उगवतें तें तेथून बारा कोसांवर उगवेल की नाही हे सांगता येत नाही. तेव्हां बोरी, बोऱ्हाटी, हेकळ, करवंदी, खैर, करंजी वगैरे झाडाझुडपांचे कुंपण करणे झाल्यास अल्पखर्चाने फार जागा न अडविता आणि वसवा न पाडतां कोणतें कुंपण घालता येईल ह्या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर देतां येणार नाही. सबब हा प्रश्न शेतकीसभेने हाती घ्यावा, आणि वाकबगार शेतकऱ्यांकडून त्याची शहानिशा करवून फायदेशीर कुंपणे ठरवावीत. कुंपण नसल्याने माणसें जाणून बुजून शेतमालाची चोरी करतात, व गवत किंवा धान्य उगवले की रस्त्याने जाणारी येणारी जनावरें शेतांत तोंड घालतात. असल्या जनावरांमध्ये देवा-पिरांला वाहिलेली जनावरें अति उपद्रव देतात. खेड्यांत मोकार जनावरे सोडण्याची सर्रास चाल आहे, ती अजिबात बंद झाली पाहिजे. पहातां पहातां ओघाने आले म्हणून येथे हेही सांगितले पाहिजे की, हलक्या जातींचे वतनदार व फिरस्ते नुसते शेतमाल व जनावरांवरच ताव मारून राहतात असें नाहीं तर ते कुणबिकीचे अनेक पोटधंदे कुणब्याला किफायतशीर होऊ देत नाहीत. इंग्लंडमध्ये निम्मी जमीन चारण राखतात, व आपल्याकडे शेकडा सतरा जमीन सुद्धां चारा-पेरीला ठेवीत नाहीत. सुमारे पावहिस्सा