पान:गांव-गाडा.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०      गांव-गाडा.

व्यापारी पोंच बिलकूल धरीत नाही. इमानेइतबारें काम करून आपणही खावें, आणि शेतधन्याचा अंश बिनबोभाट न मागतां त्याला पोहोचवावा अशी दानत फार थोड्या कुणब्यांची असते. 'असेल मालक शेती तर शेती, नाही तर माती' असें म्हणतात, त्याचा अर्थ असा आहे की, कुणब्यावर जर खंबीर राखण ठेवलें नाहीं तर शेत काहीएक हाती लागावयाचे नाही. कुणबी शेतांत काय करतो, काय चोरतो, वेळेवर पाळी घालतो किंवा नाहीं, मोट धरतो किंवा नाहीं, राखण करितो किंवा नाहीं, सारांश पत्करलेलें काम करतो किंवा नाही, यासाठी मालकाला नेहमी त्याच्या पायावर पाय देऊन उभे रहावे लागते, आणि रात्रींच्या रात्री खळ्यांत पडावे लागते. हीच अवस्था सर्व प्रकारच्या मजुरीबद्दल आहे. खुरपणी-वेचणीला जे मजूर लावावेत ते चापून मजुरी घेऊन शेतमाल घोळांत, पदरांत, भाकरीच्या पाटींत किंवा पिण्याच्या भांड्यांत चोरून आणितात. तो विकत घेण्यासाठी मिठाई, खारीक, खोबरें, सुपारी, खजूर घेऊन भिकार दुकानदार हंगामाच्या दिवसांत संध्याकाळच्या सुमारास शेतवाटांवर बसलेले असतात. धन्याचे हे श्रम आणि नुकसान वांचविले तर त्याचा मोबदला कोणीही आनंदाने देईल, आणि कुणब्याची राजरोष किफायत वाढेल. गिरण्यांसारख्या कारखान्यांत बहुतेक मजूर कुणबी वर्गातले आहेत, ते तेथे काम कुचराईने करतात. यूरोप-अमेरिकेच्या मजुरांच्या कामाचा पांचवा महावा हिस्साही हिंदी मजुराचे काम पडत नाही अशी ओरड आहे. ही का? तिचे कारण इतकेंच की, कामचोरपणा हा गुण आमच्या सर्वांच्या अंगी खिळला आहे. यूरोपियन जमीनदार, खाणीवाले व कारखानदार ह्यांनी हिंदी मजुरांना सक्तीने काम करण्याला भाग पाडण्याचे कायदे करून घेतले ते ह्या अवगुणांमुळे तर नसतीलना ? अर्थात् ह्या कायद्यांची तरफदारी करण्याचा हेतु नाही; फक्त आमचे अवगुण आम्हांला कसे नडतात हे दाखविण्याचा आहे. कामकुचरपणा व लबाडी ह्यांच्या मागोमाग येणारा दुर्गुण म्हणजे एकमेकांचा पहिल्याने अपहार, नंतर