बेलदार दहापांच बिऱ्हाडे मिळून धर्मशाळेत किंवा पोत्यांच्या पालांनी गांवाजवळ उतरतात. दर बिऱ्हाडाला पांच ते पंधरा शेळ्या, कोंबड्या, गाढवें, कुत्रीं, असतात. ते विहिरी, घरे, पार, वगैरेचे दगडकाम करतात व जातीं, उखळे, पाटे, वरवंटे, चौरंग वगैरे विकतात. बायका व पुरुष जात्यांना टांकी लावतात. घिसाडी, बेलदार भीक मागत नाहीत. वड्डर पंधरा बिऱ्हांडे एक मेळानें गवती पालांत गांवानजीक उतरतात. दर बिऱ्हाडाला दोन ते चार गाढवे, शिवाय शेळ्या, बोकड, कोंबडी, कुत्री असतात. एका गांवीं गणती केली ती-पाले १४, लहान मोठी माणसें ६०, गाढवें ३०, शेळ्या बोकड १५, शिवाय कुत्रीं. वड्डर बांधणी घालणे, विहिरी खणणे, मात-काम वगैरे मक्तत्याने करतात; जाती, उखळ, पाटे, वरवंटे वगैरे विकतात, व त्यांना टांकी देतात. माल विकणे व टांकी देणे ही कामें बहुधा बायका करतात. ह्यांच्या बायका, पोरें गांवांत भाकरी, व शेतांत धान्य मागतात. एंजिनियरकडील मक्तेदार वडारांची बायका-पोरें सुद्धां गांवांत भीक मागतांना दृष्टीस पडतात. उभे पीक व मेंढरें चोरणे, पेव फोडणे, घरफोडी वगैरे गुन्हे वड्डरांच्या कांहीं जाती करतात. ह्यांची डुकरें गांवोगांव पिकांचा धुव्वा उडवितात. कैकाडी गांवाबाहेर उघड्या पटांगणांत झाडाच्या सावलीला उतरतात. त्यांची चार पांच किंवा अधिक बिऱ्हाडे असतात. दर बिऱ्हाडाला दोन तीन गाढवें आणि शेळ्या, कोंबड्या, कुत्री असतात. ते पिटकुल, करंजी, तरवड, वगैरेंचे फोंक काढून त्यांच्या पाट्या, कणगी, कोंबड्यांचे डाले किंवा झांप करतात, आणि विकतात. ही जात भीक मागणारी व चोरटी आहे. भीक मागतांना ते घराची कुलपें काढून चोरी करतात. ज्या घरांत थोडी माणसे असतील त्याच्या मागच्या दारी कांहीं कैकाडणी बसतात, व काही जणी पुढच्या दारी भांडून एकमेकांना रक्त निघेपर्यंत मारतात. घरांतील माणसें तंटा तोडण्याला दाराबाहेर गेली म्हणजे मागच्या दारी बसलेल्या कैकाडणी आंत शिरून हाती लागेल ते घेऊन पसार होतात. पिके, धान्य, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या चोरण्यांत त्यांचा हातखंडा
पान:गांव-गाडा.pdf/139
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८ गांव-गाडा.
